ठाणे: भाऊ आणि वहिनीच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांवर कारवाई होत नसल्यानं एका व्यक्तीनं कॅमेऱ्यासमोर आपलं बोटं छाटलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नंदकुमार ननावरेंनी २० दिवसांपूर्वी पत्नीसह आत्महत्या केली. या आत्महत्येला अंबरनाथेचे आमदार बालाणी किणीकर यांचे पीए जबाबदार असल्याचा आरोप आहे. ननावरे दाम्पत्य काही जणांच्या त्रासाला कंटाळले होते, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. साताऱ्यातील काही लोक आम्हाला मानसिक त्रास देत असल्यानं टोकाचं पाऊल उचलत असल्याचं ननावरे आत्महत्येपूर्वी म्हणाले होते. तसा व्हिडीओदेखील त्यांनी रेकॉर्ड केला होता. घटनेला २० दिवस उलटूनही आरोपींपैकी कोणालाच अटक न झाल्यानं नंदकुमार यांचे भाऊ धनंजय ननावरेंनी त्यांचं एक बोट कापून घेतलं. धनंजय यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ‘माझं बोटं छाटून राज्य सरकारला पाठवलं आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत शरीराचा एक-एक अवयव कापून सरकारला पाठवत राहणार. ज्या बोटानं मोदी सरकारला मतदान केलं, तेच बोट मी कापलं,’ अशा शब्दांत धनंजय यांनी उद्विग्नता व्यक्त केली.धनंजय ननावरेंचा व्हिडीओ व्हायरल होताच तपासाची चक्रं वेगानं फिरली. शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीय सहाय्यक शशिकांत साठे, पप्पू कलानी यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते कमलेश निकम, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी नरेश गायकवाड यांच्यासह आणखी २ ते ३ जणांना ठाणे क्राईम ब्रँचने अटक केली.प्रकरण काय?नंदकुमार ननावरे त्यांच्या कुटुंबासह उल्हासनगरच्या कॅम्प मंबर चारच्या अशेलेपाडा परिसरात राहायचे. २० दिवसांपूर्वी त्यांनी पत्नी उर्मिलासोबत बंगल्याच्या छतावरुन उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्येच्या काही दिवसांनंतर एक व्हिडीओ समोर आला. त्यात ननावरेंनी कमलेश निकम, संग्राम निकाळजे, वकील ज्ञानेश्वर देशमुख, नितीन देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं नंदकुमार ननावरेंनी व्हिडीओत म्हटलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here