म. टा. प्रतिनिधी, पुणेः दहा वर्षांपासून पुणे पोलिसांना गुंगारा देत वेगवेगळ्या नावाने आणि वेषांतर करून राहणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. कोथरुड पोलिसांनी सापळा रचून या आरोपीला अटक केली. यासाठी पोलिसांनी वेषांतर करत काही दिवस त्या परिसरात वास्तव्य केले.

प्रवीण दत्तात्रय पायगुडे (वय ३१, रा. कासुर्डी, ता. भोर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रविण याच्यावर दहा वर्षापूर्वी २०१० मध्ये कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर तो पसार झाला होता. गेली अनेक वर्षं पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र तो प्रत्येकवेळी पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, फरार व पाहिजे असलेल्या आरोपींची माहिती घेऊन त्यांना पकडण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या होत्या.

कोथरुड पोलिसांना प्रवीण हा कासुर्डी येथे दाद्या या टोपण नावाने राहत असल्याची माहिती मिळाली होती. याची माहिती घेण्यासाठी पोलिस कर्मचारी अजय सावंत व विजय कांबळे यांनी या गावात वेशांतर करत माहिती घेतली. काही दिवस या गावात घालवल्यानंतर त्यांना तो प्रवीण असल्याची खात्री पटली. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक प्रतिभा जोशी, उपनिरीक्षक संतोष पाटील, कर्मचारी युवराज काळे, श्रीकांत माने, नितीन कानवडे यांच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. त्याच्यावर चोरी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here