चंद्रपूर: जिल्ह्यामध्ये विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्री यांनी ३ सप्टेंबरपासून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने कडक होणार असल्याच्या सूचना केलेल्या आहेत. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे कडक लॉकडाऊन करण्याच्या परवानगी करिता प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी व्हिडिओ संदेश जारी करताना दिली आहे.

वाचा:

३ ते ८ सप्टेंबरपर्यंत आरोग्य सेवा संदर्भातील आस्थापना वगळून सर्व प्रकारची दुकाने, किराणा दुकाने, सर्व व्यवसाय, आस्थापना या संपूर्णतः बंद राहतील. ८ ते १२ सप्टेंबरपर्यंत सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने आणि त्यांचे ठोक विक्रेते म्हणजेच किराणा दुकाने, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, मास-मासे विक्री, पशुखाद्य इत्यादींच्या आस्थापना सुरू राहतील. इतर सर्व प्रकारचे दुकाने आणि आस्थापना बंद राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

वाचा:

याबाबत परवानगी संदर्भातील प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे लॉकडाऊन सुरू होण्याअगोदर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून घ्यावी. या कालावधीमध्ये नागरिकांनी घरातच राहून लॉकडाऊनचे पालन करावे आणि प्रशासनाला करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

जिल्ह्यातील करोना स्थिती गंभीर

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील करोना संसर्गाची स्थिती गंभीर होत चालल्याने लॉकडाऊनचा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी हा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २ हजार ६३३ झाली असून त्यातील १ हजार १९१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार ४२३ इतकी असून रोज रुग्णसंख्येचा आलेख वाढत असल्याने सारेच चिंतेत आहेत.

वाचा:

राज्यातील एकूण रुग्णसंख्या ८ लाखांवर

आतापर्यंत राज्यात ४२ लाख ११ हजार ७५२ जणांच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील ८ लाख ८ हजार ३०६ व्यक्तींच्या चाचण्या करोना पॉझिटिव्ह आल्या आहेत तर बाकीच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. एकूण चाचण्यांच्या १९.१९ टक्के चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. राज्यात सद्यस्थितीत १ लाख ९८ हजार ५२३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दैनंदिन नवीन करोना बाधित रुग्णांचा आकडाही गेल्या तीन दिवसांपासून १५ हजारच्या वर असल्याने चिंता वाढत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here