नाशिकरोड: करत असताना चेहेडी पंपिंग स्टेशनजवळ पात्रात पडलेल्या मामा भाच्यापैकी मामाचे प्राण केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचले तर भाचा पाण्यात बुडाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. ( )

वाचा:

अजिंक्य उर्फ आदित्य राजाभाऊ गायधनी (वय २२) आणि चरण पुंडलिक भागवत (वय २८) रा. गजानन पार्क, खर्जुल मळा, नाशिकरोड या दोघांपैकी याचा बुडून मृत्यू झाला तर चरण हा सुदैवाने बचावला आहे. स्थानिक नागरिकांची वेळीच मदत मिळाल्याने चरणचे प्राण वाचले.

या घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपायुक्त विजय खरात, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी घटनास्थळी भेट देवून मदतकार्याच्या सूचना दिल्या. काही वेळातच हजर झालेले पालिकेचे नाशिकरोड अग्निशमन दल, भोसला अॅडव्हेंचर फाउंडेशन आणि राष्ट्रपती जीवरक्षक पुरकार विजेते गोविंद तुपे (रा. बेलू) आदींनी तीन तासांहून अधिक काळ वालदेवी नदी पात्रातील पाण्यात शोधकार्य राबवूनही अजिंक्यचा शोध लागू शकला नाही. अजिंक्य हा शिवसेनेचा युवा कार्यकर्ता होता. या घटनेची माहिती मिळताच अजिंक्यच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माजी आमदार योगेश घोलप, नगरसेवक बाजीराव भागवत, पंडित आवारे, सत्यभामा गाडेकर, माजी नगरसेवक शिवाजी भागवत आदी घटनास्थळी उपस्थित होते. रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे अग्निशमन दलाचे मोठे वाहन मात्र नदीपर्यंत पोहचू शकले नाही.

वाचा:

अजिंक्य हा बहिण श्रद्धा आणि मामा चरण भागवत यांना सोबत घेवून संगमेश्वर महादेव मंदिर भागात वालदेवी नदी पात्रात गणेश विसर्जनासाठी गेला होता. या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने अजिंक्य पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी चरण भागवत यांनी प्रयत्न केले असता ते देखील पाण्यात पडले. ही घटना जवळच उभी असलेली अजिंक्यची बहिण श्रद्धा (वय १२) हिने बघितल्यावर तिने मदतीसाठी आरडाओरडा केला.

पूजाच्या प्रसंगावधाने वाचले एकाचे प्राण

श्रद्धाची मदतीची हाक नदीच्या काठावरच वास्तव्यास असलेल्या रतन पाळदे यांनी ऐकली. कोणीतरी पाण्यात बुडाल्याचे त्यांनी मुलगी पूजा हिला सांगितले. पूजा पाळदे हिने क्षणाचाही विचार न करता मदतकार्यास सुरुवात केली. घराच्या पडवीत कपडे वाळवण्यासाठीच्या सर्व दोऱ्या पूजाने घाईघाईने कापल्या. भावाला पोहायला शिकण्यासाठी आणलेल्या ट्युबमध्ये काही क्षणात हवा भरली. दोरी ट्युबला बांधली. हवा भरलेले ट्यूब आणि दोरी वडील रतन पाळदे यांच्या हाती सोपविली. तोपर्यंत रतन पाळदे यांनी जवळच वास्तव्याला असलेले अशोक माळी, राजेश पवार यांना मदतीसाठी हाक दिली. हे सर्वजण तातडीने नदीपात्रात उतरले. पूजाने तयार केलेले ट्यूब पाण्याच्या प्रवाहत फेकले. अशोक माळी आणि राजेश पवार यांनी पाण्यात उडी घेत या ट्युबच्या सहाय्याने पाण्यात बुडणाऱ्या चरण भागवत यांना पकडले व पाण्याबाहेर काढले. अजिंक्यचा मात्र कोणताच थांगपत्ता लागला नाही.

वाचा:

माझ्या दादाला वाचवा हो…

चरण भागवत यांना पाण्याबाहेर काढल्यावर लहानग्या श्रद्धाने ‘माझ्या दादाला वाचवा हो…’ असा टाहो फोडला. परंतु पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने अजिंक्यचा शोध घेण्याचा प्रयत्न करूनही तो मिळू शकला नाही.

नदीच्या पाण्यात कोणीतरी बुडाल्याचे कळताच तत्काळ मदतीसाठी साहित्याची जमवाजमव केली. शाळेत शिकलेल्या स्काऊट गाइड अभ्यासक्रमातील दोरीच्या गाठींचा आणि पाण्यात बुडालेल्यास कसे वाचवायचे याच्या अभ्यासाचा आज उपयोग झाला. मदत करताना हात थरथरत होते. परंतु धीर सोडला नाही. एकाला पाण्यातून बाहेर काढू न शकल्याचे दु:ख वाटते, अशा भावना पूजा पाळदे हिने व्यक्त केल्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here