नागपूर : नागपूर विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) एअर अरेबियाच्या विमानातून आलेल्या एका सोन्याच्या तस्कराला काल शुक्रवारी पहाटे चारच्या दरम्यान दीड किलो सोन्यासह अटक केली. हे सोने वितळलेले किंवा पेस्ट स्वरूपात होते जे तस्कराने त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवले होते. जप्त केलेल्या सोन्याची किंमत ३० लाखांहून अधिक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर अरेबियाच्या फ्लाइटमध्ये सोन्याचा तस्कर आल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली. एजन्सीने नागपूर विमानतळावर सापळा रचला. प्रवाशांची बाहेर पडताना तपासणी करण्यात आली, त्यादरम्यान एका प्रवाशाच्या चालण्याच्या हावभावावरून एजन्सीला संशय आला. डीआरआयने त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. झडतीदरम्यान त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून ठेवलेले ७४३.५६ ग्रॅम सोने सापडले. सोने पेस्ट स्वरूपात होते. सचिन चांदोस्कर असे आरोपीचे नाव असून तो उल्लास नगर ठाणे येथील रहिवासी आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. सचिन शारजाहून ते नागपुरात आला होता.

नाशिकचं कार्यालय सोडण्यास ‘दादा’ गटाचा नकार, ‘साहेब’ गटाने थेट तंबू ठोकून ऑफिस मांडलं
त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासल्यानंतर तो दुबईहून अनेकवेळा भारतात आल्याचे आढळून आलं आहे. शारजाहून प्रथमच नागपुरात येणार असल्याची माहिती मिळाली असली तरी, नागपूर विमानतळावर सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी सीमाशुल्क विभागाने एका सोन्याच्या तस्कराला सोन्यासह अटक केली होती. डीआरआयने आरोपीचा पासपोर्ट जप्त केला आहे. आरोपीची चौकशी सुरू आहे.

सचिन चांदोस्कर याने खास डिझाइन केलेल्या गुदाशयात सोन्याची पिवळी पेस्ट लपवून ठेवली होती. एका गुप्त माहितीवरून अधिकाऱ्यांनी तरुणाची कसून तपासणी केली असता त्याच्या गुदाशयात सोन्याची पेस्ट सापडली. सोन्याचे भौतिक स्वरूप बदलण्यासाठी त्यात काही रसायने जोडली जातात, ज्यामुळे ते द्रव स्वरुपात होते. कस्टम ड्युटी चुकवण्यासाठी प्रवाशाने सोन्याची तस्करी केली आणि विमानतळाबाहेरील एका व्यक्तीकडे ते पोहोचवणार होते. सीमाशुल्क कायदा १९६२ अन्वये नागपूर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे.

Sion Accident : वाशिमचा दिनेश डोळ्यात स्वप्न घेऊन मुंबईत, पण जोडप्याने ‘खून केला’, बघ्यांवरही कुटुंबाचा संताप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here