सप्टेंबर महिन्यात करोना साथरोग उच्चांक गाठण्याचे इशारे दिले जात असतानाच, महिन्याच्या पहिल्याच दिवशी एकाही रुग्णालयात आयसीयू युक्त खाटा उपलब्ध नव्हत्या. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात दहा रुग्णालयात आयसीयू व्हेंटिलेटरयुक्त खाटा उपलब्ध असल्याचे दिसून येत होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने केवळ जंबो सेंटरवर विसंबून न राहता, अन्य रुग्णालयातही व्हेंटिलेटरयुक्त खाटांचे नियोजन करावे, अशी मागणी केली जात आहे.
वाचा:
‘सप्टेंबर महिन्यात पुण्यात साथरोग उच्चांक गाठेल, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जात आहे. मात्र, महापालिका प्रशासन गाफील असल्याचे डॅशबोर्डवरील व्हेंटिलेटरयुक्त खाटांच्या अनुपलब्धतेवरून दिसत आहे. जंबो कोविड केअर सेंटरमुळे खाटांची कमतरता भासणार नाही, असा दावा केला जात होता. प्रत्यक्षात सीओईपीच्या ८०० बेडच्या रुग्णालयात केवळ तीसच व्हेंटिलेटरयुक्त खाटा उपलब्ध आहेत. त्यामुळे जंबो कोविड सेंटर हे व्हेंटिलेटरयुक्त खाटांच्या कमतरतेवर उपाय असू शकत नाही, हे वारंवार सांगूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी टीका आम आदमी पक्षाचे डॉ. अभिजित मोरे यांनी केली.
वाचा:
महापालिकेची सर्व रुग्णालये सुरू करून, तिथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटरयुक्त खाटांची सोय केली पाहिजे. कमला नेहरू रुग्णालयांतील आयसीयू सुरू केले पाहिजे. त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार केला पाहिजे. त्यामध्ये शहरातील लहान रुग्णालयांशी करार करून, त्यांनाही या योजनेच्या कक्षेत आणले पाहिजे, जेणेकरून अधिकाधिक बेड रुग्णांना उपलब्ध होतील, असे डॉ. अभिजित मोरे यांनी नमूद केले.
व्हेंटिलेटरयुक्त खाटा उपलब्ध असलेली रुग्णालये
महापालिका क्षेत्र – ०
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र – १०
पुणे ग्रामीण क्षेत्र – १८
दरम्यान, राज्यात सध्या १ लाख ९८ हजार ५२३ इतक्या रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील सर्वाधिक ५४ हजार ८५७ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.