नवी दिल्लीः नोएडा येथील भाजपचे आमदार आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्या करोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पंकज सिंह यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात अलेल्यांनी स्वतःला आयसोलेट करावं आणि करोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

‘करोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांनंतर मी चाचणी केली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्क आलेल्या सर्वांनी कृपया स्वतःला अयसोलेट करावं आणि करोना चाचणी करून घ्यावी’, असं पंकज सिंह यांनी ट्विट करून म्हटलंय.

उत्तर प्रदेशात भाजप नेत्यांना करोनाचा संसर्ग सुरूच आहे. पंकज सिंग यांच्या आधी यूपी सरकारमधील मंत्री मोहसिन रझा हे करोना पॉझिटिव्ह आढळून आले. मोहसीन रझा यांनी सोमवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन रझा यांनी नागरिकांना केले.

यूपी सरकारमधील अनेक मंत्र्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी चेतन चौहान आणि कमल राणी वरुण यांचे निधन झाले आहे. यूपी सरकारचे जल उर्जामंत्री डॉ. महेंद्रसिंग हे देखील करोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. क्रीडामंत्री उपेंद्र तिवारी यांनाही करोनची लागण झाली होती. उपेंद्र तिवारी यांच्या आधी राजेंद्र प्रताप सिंह, धरमसिंह सैनी आणि स्वतंत्रदेव सिंह यांनाही करोनाचा संसर्ग झाला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here