नवी दिल्लीः भाजप आणि फेसबुकचं संगनमत असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. तर आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री यांनी फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक मोठं पत्र लिहिलं आहे. फेसबुकच्या राजकीय पक्षांशी संगनमताच्या आरोपावरून प्रसाद यांचे पत्र महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.

फेसबुक इंडियाची टीम राजकीय विचारसरणीच्या आधारे भेदभाव करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांसाठी अपशब्द वापरतात. फेसबुक इंडिया टीममधील अनेक वरिष्ठ अधिकारी विशिष्ट राजकीय विचारसरणीचे समर्थक असल्याची माहिती मिळाल्याचं प्रसाद यांनी पत्रात लिहिलं आहे.

फेसबुकने निष्पक्ष असावं

२०१९ च्या निवडणुकीपूर्वी फेसबुक इंडिया व्यवस्थापनाने उजव्या विचारसरणीच्या समर्थकांचे फेसबुक पेज हटवले किंवा त्यांची पोहोच कमी केली. फेसबुकने संतुलित आणि निष्पक्ष असायला हवं, असे प्रसाद यांनी पत्रात म्हटलं आहे. कोणत्याही संस्थेत काम करणार्‍या व्यक्तींची आवड आणि निवड वेगळी असू शकते. पण याचा परिणाम एखाद्या संस्थेच्या सार्वजनिक धोरणावर होऊ नये, असं प्रसाद यांनी पत्रात लिहिलंय.

यापूर्वी खूप वेळा मेल: प्रसाद

‘या संदर्भात अनेकवेळा फेसबुक व्यवस्थापनाला आपण मेल केले. पण प्रतिसाद मिळाला नाही. कोट्यवधी लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एखाद्या व्यक्तीची राजकीय बांधिलकी लादणं अजिबात मान्य नाही’, असं प्रसाद यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल

दुसरीकडे कॉंग्रेसने मंगळवारी काही आंतरराष्ट्रीय मीडिया ग्रुपच्या वृत्तांचा हवाला देत फेसबुक आणि भाजपत ‘संगनमत’ असल्याचा पुन्हा आरोप केला. भारताची लोकशाही आणि सामाजिक सौहार्दावर झालेला हल्ला उघडकीस आला आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्राची ताजी बातमी ट्विटरवर शेअर करताना सरकारवर निशाणा साधला. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या भारताच्या लोकशाही आणि सामाजिक सद्भावनेवर केलेल्या हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी पर्दाफाश केला आहे. कोणत्याही परदेशी कंपनीला भारताच्या अंतर्गत कामात हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. त्यांची त्वरित चौकशी केली पाहिजे आणि दोषी आढळल्यास त्यांना शिक्षा व्हायला हवी, असं राहुल गांधी म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here