लडाख : लडाखमध्ये आज सायंकाळच्या सुमारास भारतीय लष्कराचे वाहन दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. क्यारी शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर झालेल्या या अपघातात ९ जवान शहीद झाले असून काही जवान जखमी झाल्याचे समजते. शहीद जवानांमध्ये एक ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जवान कारू गॅरिसनपासून लेहजवळील क्यारी शहराकडे जात होते. मात्र सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास क्यारी शहराजवळ असताना जवानांचे वाहन दरीत कोसळले. या वाहनातून १० पेक्षा अधिक जवान प्रवास करत होते. खोल दरीत वाहन कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या ९ जवानांनी जागीच प्राण गमावले, तर अन्य काही जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्री बदलाची चर्चा, पालकमंत्रिपद अन् खरी राष्ट्रवादी कोणाची? भुजबळ रोखठोक बोलले!

संरक्षण मंत्र्यांकडून शोक व्यक्त

लष्करातील जवानांसोबत घडलेल्या दुर्घटनेनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. सिंह यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, ‘लडाखमध्ये लेहजवळ झालेल्या भारतीय जवानांच्या मृत्यूने मी दु:खी झालो आहे. देशाप्रती त्यांनी दिलेलं योगदान कोणीही विसरणार नाही. शहीद जवानांच्या कुटुंबाप्रती माझ्या सहवेदना आहेत. जखमी जवानांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, यासाठी प्रार्थना करत आहे,’ अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here