वर्धा: वर्ध्याच्या नगरपरिषदेत भाजपची एकहाती सत्ता आहे. २६ नगरसेवक आणि नगराध्यक्षही भाजपचाच आहे. एकही विरोधी नगरसेवक नगर परिषदेत नाही मात्र आता अंतर्गत कलहातून रणकंदन माजले असून थेट नगराध्यक्ष यांच्या खुर्चीलाच चपलांचा हार घालण्यात आला आहे. ( President )

वाचा:

आर्वी शहरात मागील काही दिवसांपासून कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. त्यामुळे शहरात कचऱ्याचे ढिग साचले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. नगराध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचा स्वपक्षाच्या नगरसेवकांनी केला असून आता तर चक्क चपलांचा हार आणि बेशरमचे झाड नगराध्यक्षांच्या खुर्चीला भेट म्हणून देण्यात आला आहे. या अनोख्या पद्धतीने झालेल्या निषेधाची सर्वत्र चर्चा आहे. यावेळी आरोग्य सभापती गंगा सुभाष चकोले, गट नेता प्रशांत ठाकूर, भाजपचे आर्वीचे अध्यक्ष व नगरसेवक जगन गाठे, माझी आरोग्य सभापती रामू राठी, प्रकाश गुलहाने, हर्षल पांडे, मिथुन बारबैले, मनोज कसर, कैलास गळहाट उशा सोनटक्के व इतर नगरसेवक उपस्थित होते.

वाचा:

आर्वीकरांनी भाजपला भरघोस मतदान केले होते. नगर परिषदेतील सर्व २६ जागा भाजपच्या पदरात पडल्या होत्या. २६ पैकी २६ नगरसेवक भाजपचे निवडून आल्याने विरोधकांना मोठा हादरा बसला होता. नगराध्यक्षपदाची निवडणूकही थेट होती आणि या पदासाठीही आर्वीकरांनी भाजपलाच कौल दिला होता. मात्र नगराध्यक्षांच्या कारभारावर बाकीचे सर्वच नगरसेवक सध्या नाराज आहेत. यात सध्या संकटकाळ असताना शहरात कंत्राटी कामगारांना वेतन न दिल्याने काम बंद त्यांनी काम बंद केले व भीषण स्थिती निर्माण झाली आहे. शहरात घंटागाडी फिरत नसल्याने तसेच कचरा उचलण्याचे काम बंद असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या सगळ्याला नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांचा मनमानी कारभार कारणीभूत असल्याचा खुद्द सव्वालाखे यांच्या पक्षातीलच सर्व नगरसेवकांचा आरोप आहे. त्यातूनच आपल्याच नगराध्यक्षाविरुद्ध भाजपला आंदोलन करावं लागलं.

वाचा:

गेल्या काही दिवसांपासून आर्वी शहरातील स्वच्छतेचे तीनतेरा वाजलेले असताना नगराध्यक्षांना त्याचं कोणतंच सोयरसुतक नाही. या प्रश्नावर साधी एखादी बैठकही त्यांनी घेतलेली नाही. नगरसेवक म्हणून नागरिकांना सोयीसुविधा देणे ही आमची जबाबदारी आहे व दररोज नागरिकांना आम्हाला तोंड द्यावे लागत आहे. अशावेळी नगराध्यक्ष बेजबाबदारपणे वागत असल्यानेच हे आंदोलन करावे लागले, असे सांगण्यात आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here