: मार्चपासून आजपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता तब्बल ३०० झाली आहे. २१ ऑगस्टला जिल्ह्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २०० होती. मागील अकरा दिवसात ही संख्या ३०० वर गेली आहे. याचाच अर्थ मागील अकरा दिवसांमध्ये करोनामुळे दररोज सरासरी आठ ते दहा जणांचा मृत्यू होत असून हा आकडा नगरकरांची चिंता वाढवणारा आहे.

नगरमध्ये आता करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे चिंतेत भर पडत असताना दुसरीकडे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही आता ३०० वर जाऊन पोहोचली आहे. काळाचा विचार केल्यास, तब्बल सहा हजारावर करोनाबाधित रुग्ण या काळात वाढले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे.

गणेशोत्सव काळाचा विचार केल्यास २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यातील करोनाबधितांची संख्या तब्बल ६ हजार १७४ वाढली आहे. यामध्ये २२ ऑगस्टला ६०३ बाधित रुग्ण, २३ ऑगस्टला ५६६ बाधित , २४ ऑगस्टला ५१९ बाधित, २५ ऑगस्टला ४२६ बाधित, २६ ऑगस्टला ८१० बाधित रुग्ण, २७ ऑगस्टला ५७७ बाधित, २८ ऑगस्टला ५४५ बाधित, २९ ऑगस्टला ६३२ बाधित, ३० ऑगस्टला ४६५ बाधित, ३१ ऑगस्टला ४२१ व १ सप्टेंबरला ६१० करोना बाधित वाढले आहेत. त्यामुळे आता एकूण बाधितांचा आकडा हा २२ हजार ८२ झाला आहे. यापैकी करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १८ हजार ५५७ झाली असून सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ही ३ हजार २२५ एवढी आहे. तर, करोनामुळे आतापर्यंत ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा विविध उपाययोजना करीत आहे.

दृष्टीक्षेपात नगर जिल्ह्यातील स्थिती:

जिल्ह्यातील एकूण करोना बाधित : २२ हजार ८२

करोना आजारातून बरे झालेले रुग्ण : १८ हजार ५५७

हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले बाधित : ३ हजार २२५

करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या : ३००

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here