मुंबई : सायबर चोर फसवणुकीची नवनवीन पद्धती शोधत असतात. पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडले असल्याचे सांगून गुन्ह्यामध्ये अडकविण्याची भीती दाखवत आर्थिक लूट केली जात आहे. वाकोला येथील एका महिला बँक कर्मचाऱ्याला अशाच प्रकारे जाळ्यात अडकवून तिच्याकडून चार लाख रुपये उकळण्यात आले. तर खार येथील तरुणीकडून पोलिस कारवाई टाळण्यासाठी सुमारे अडीच लाख रुपये घेण्यात आले. ही फसवणूक असल्याचे लक्षात आल्यानंतर दोघींनी पोलिसांत धाव घेतली आहे.

वाकोला येथील ज्योती (बदललेले नाव) या एका खासगी बँकेत उच्चपदावर कार्यरत आहेत. त्याच्या मोबाइलवर एका व्यक्तीने फोन केला आणि आपण तैवान येथे पाठविलेले पार्सल त्यामध्ये ड्रग्ज असल्याने परत आल्याचे सांगितले. यावर ज्योती हिने आपण कोणतेही पार्सल तैवानला पाठविले नसल्याचे सांगितले. त्यावर आपल्या नावानेच बुकिंग करण्यात आली असून तुम्ही याबाबत सायबर अधिकाऱ्यांसोबत बोला, असे सांगून त्याने एका महिलेला फोन जोडून दिला. या महिलेने आपल्या नावावर मनी लॉन्डरिंगचा गुन्हा असल्याचे सांगितले. हा गुन्हा रद्द करायचा असेल तर उपायुक्तांची परवानगी आवश्यक आहे, असे सांगून स्वामी यांचा क्रमांक दिला. स्वामी नावाच्या व्यक्तीनेही ज्योती यांना या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी दंड म्हणून काही रक्कम पाठवावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर ज्योती हिने टप्याटप्याने सुमारे चार लाख रुपये दिलेल्या बँक खात्यावर पाठविले. त्यानंतरही पैशाची मागणी सुरूच राहिल्याने फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले.

Loksabha Election 2024: भाजप भाकरी फिरवणार! लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीतील हालचालींना वेग
खारमधील गृहिणी असलेल्या वीणा यांनाही असाच फोन आला आणि त्यांनी तुमच्या नावाचे पार्सल परदेशातून आले असल्याचे विमानतळावरील अधिकाऱ्याचा बनाव करत सांगितले. यामध्ये काही पासपोर्ट, अमली पदार्थ आणि महागड्या वस्तू असल्याचे सांगण्यात आले. कोणतेच पार्सल पाठविले नसल्याने वीणा बुचकळ्यात पडल्या आणि तितक्याच घाबरल्या. त्यानंतर या बनावट अधिकाऱ्याने इतरांचा क्रमांक देऊन संपर्क करण्यास सांगितले. संबंधित अधिकाऱ्याने पोलिस असल्याचे ओळखपत्र पाठवून वीणा यांना गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखविण्यास सुरुवात केली. यामुळे तणावाखाली आलेल्या वीणा यांनी प्रकरण मिटविण्यासाठी दोन लाख ६२ हजार रुपये पाठविले. मात्र ज्यावेळी समोरून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच तिने पोलिसांत तक्रार केली.
कांदाप्रश्न पेटणार! कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क; कांदा उत्पादक संघटना आक्रमक

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here