मुंबई : तेजीच्या वाटेत खो घालणाऱ्या नफेखोरांमुळे आणि निफ्टीत अडथळा निर्माण झाला आहे. बाजारात एकाचवेळी तेजीची लाट आणि विक्रिचा सपाटा असा अनुभव सध्या गुंतवणूकदार घेत आहेत. मंगळवारच्या सत्रात वित्तीय, दूरसंचार आणि धातू समभागांच्या तेजीने दिवसअखेर निर्देशांकांनी वाढ नोंदवली. बाजार बंद होताना निफ्टीत ८२,७५ अंकांची वृद्धी झाली व ११,४००० अंकांची पातळी ओलांडत ११,४७०.२५ अंकांवर पोहोचला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सदेखील २७२.५१ अंकांनी वाढून ३८,९००.८० अंकांवर स्थिरावला.

कालच्या सत्रात सर्वोच्च न्यायालयाची समायोजित एकूण शुल्काबाबत दूरसंपर्क कंपन्यांना दिलेली मुदत बाजारात तेजी आणण्यास निर्णायक ठरली. भारती एअरटेल ७.०९ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील ६.५४ टक्के, हिंडाल्को ५.२६ टक्के, एशियन पेंट्स ४.४१ टक्के आणि बजाज फायनान्स ४.३६ टक्के, ओएनजीसी २.८७ टक्के, अॅक्सिस बँक १.९६ टक्के, अदानी पोर्ट्स १.३४ टक्के आणि इन्फोसिस १.५१ टक्के हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. निफ्टी मेटल हा सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा निर्देशांक ठरला व ३.४१ टक्क्यांनी वधारला. बीएसई मिडकॅप १.१६ टक्कयांनी वाढला आणि बीएसई स्मॉलकॅपने ०.५४ टक्क्याची वृद्धी घेतली.

ऑगस्ट महिन्यात कंपनीच्या एकूण वाहन विक्रीत ३१ टक्क्याची घट झाली. ऑगस्टमध्ये कंपनीची देशांतर्गत विक्री ५,८२४ एवढी होती. घसरण होऊनही, अशोक लेलँडचा शेअर २.२२ टक्क्या नी वाढून ६९.१५ रुपयांवर बंद झाला. सर्वोच्च न्यायालयाने अदानी पॉवरला राजस्थानातून नुकसान भरपाई वसूल करण्याची परवानगी देणा-या एपीटीईएलच्या आदेशाचे समर्थन केले. आयातीत कोळशाची किंमत जास्त असल्याचे म्हटले. परिणामी, अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये ४.३० टक्क्याची वाढ झाली व तो ३८.८५ रुपयांवर बंद झाला.

एस्कॉर्ट्स लिमिटेडने ऑगस्ट महिन्यात वाहन विक्रीत वाढ झाल्याची नोंद केली. त्याच महिन्यात ट्रॅक्टर विक्रीत ८० टक्क्याची वाढ झाली. कंपनीची देशांतर्गत विक्री ७९.४ टक्क्यांनी वाढली तर निर्यातीत ९०.४ टक्क्याची वृद्धी झाली. परिणामी, कंपनीचा शेअर २.७० टक्क्यांनी वाढला व १११७ रुपयांवर बंद झाला.
चलन बाजारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने काहीशी वाढ घेत ७२.८७ रुपयावर पोहचला.

अमेरिका-चीनमधील वाढता तणाव आणि डॉलरचे घटते मूल्य यामुळे आशियाई आणि युरोपियन निर्देशांकांनी संमिश्र संकेत दर्शवले. नॅसडॅक ०.६८ टक्क्याने वाढले, एफटीएसई एमआयबी ०.६९ टक्क्यानी वाढले. तर हँगसेंगच्या शेअर्समध्ये ०.०३ टक्के वाढ झाली. निक्केई २२५ आणि एफटीएसई १०० ने अनुक्रमे ०.०१ टक्के आणि १.१५ टक्क्याची घट झाली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here