मुंबई

अभिनेता सलमान खानची भूमिका असलेला ‘रेस-३’ चित्रपट फ्लॉप ठरला. नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझा याने दिग्दर्शन केलेला ‘रेस-३’ चित्रपट समीक्षकांच्याही पचनी पडला नव्हता. त्यात चित्रपटच्या शुटिंगवेळी सलमान आणि रेमोमध्ये भांडण झाल्याचीही माहिती समोर आली. चित्रपटाला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढे दोघंही आणखी दुरावले गेल्याची चर्चा सुरू झाली.

बॉलीवूड वर्तुळातील या चर्चेबाबत रेमो डिसुझाला विचारलं असता त्यानं सलमानसोबतच्या वादाचं वृत्त फेटाळून लावलं आहे. ‘सलमानच्या आजही मी संपर्कात असून आम्ही भेटतोही. याशिवाय चित्रपटांबाबत चर्चा देखील करतो’, असं रेमोनं सांगितलं. याशिवाय, ‘डँसिंग डॅड’ नावाचा चित्रपट आपल्याकडे असून त्यात सलमान खानने काम करावं अशी इच्छा असल्याचंही रेमो म्हणाला.

‘रेस-३’ ने धडा शिकवला
‘रेस-३’ चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसला तरी सलमानने चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यासाठी माझी निवड केली याचा मला आनंद आहे. या चित्रपटातून मला धडा घेता आला. अर्धवट कथेच्या आधारावर चित्रपट स्विकारू नये आणि सेटवर दिग्दर्शक म्हणून आपली बाजू भक्कमपणे मांडता यायला हवी’, असं रेमो म्हणाला.

रेमोचा सध्या ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ चित्रपट येऊ घातला आहे. यात अभिनेता वरुण धवन, अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्यासोबत नोरा फतेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. येत्या २४ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here