महाराष्ट्रातून कुणाला संधी?
महाराष्ट्रातून काँग्रेस कार्यकारिणीत मुकुल वासनिक आणि अशोक चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. तर, अविनाश पांडे हे महासचिव, रजनीताई पाटील आणि माणिकराव ठाकरे प्रभारी म्हणून समितीवर असतील. तर, चंद्रकांत हंडोरे कायम निमंत्रित म्हणून समितीवर असणार आहेत. याशिवाय विशेष निमंत्रित म्हणून यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे यांना विशेष आमंत्रित म्हणून संधी देण्यात आली आहे. मल्लिकार्जून खरगे यांनी त्यांच्या टीममध्ये तरुण नेत्यांना संधी देण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यासह सचिन पायलट, चरणजीत सिंह चन्नी, कुमारी शैलजा, दीपेंद्र सिंह हुड्डा, गौरव गोगोई आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांना संधी देण्यात आली आहे. यूपीएच्या सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेल्या ए.के. अँटनी यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय आंबिका सोनी, अधीर रंजन चौधरी, मीरा कुमार आणि दिग्विजय सिंह यांच्या नावाचा समावेश आहे.
अशोक चव्हाण यांच्याकडून आभार
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीत संधी दिल्याबद्दल केंद्रीय नेतृत्त्वाचे आभार मानले आहेत. काँग्रेस पक्षानं दिलेली जबाबदारी विनम्रपणे स्वीकारत असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. काँग्रेस पक्ष आणि देशाच्या विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस पक्षाची मूल्य आणि तत्वांसाठी पूर्णपणे काम करणार आहे. काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांसोबत आणि पक्षनेतृत्त्वासोबत कार्यरत राहणार असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.