नवी दिल्ली : ‘दलित अत्याचाराच्या वाढत्या घटनांबद्दल सरकारला दोष देणं योग्य नाही. यासाठी समाजाची धारणा दोषी आहे. आजचा दलित चांगले कपडे परिधान करू लागलाय. तो आज कुणालाही वाकून नमस्कार करत नाही. याच रागातून त्यांच्याविरुद्ध अत्याचाराच्या घटना वाढत आहेत’, असं मत व्यक्त केलंय केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष यांनी. ‘नवभारत टाईम्स’च्या एका मुलाखतीत बोलताना रामदास आठवले यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.

भाजप ?

या मुलाखतीत बोलताना दलित अत्याचाराच्या घटनांत वाढ झाल्याचं रामदास आठवले यांनी नाकारलं नसलं तरी यामागे सामाजिक भेदभाव कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलंय. ‘हे खरं आहे की एका वेळेपर्यंत भाजपला ब्राह्मणांचा पक्ष म्हटलं जात होतं. परंतु, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीचा निकाल पाहिला तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला जेवढ्या मोठ्या संख्येनं लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तो केवळ ब्राह्मणांच्या मतांवर शक्य नाही. भाजपला सगळ्यांनी मतं दिलीत. आता तो दलित पक्षही आहे, मागासवर्गीयांचा आणि अल्पसंख्यांकाचाही’ असं रामदास आठवले यांनी म्हटलंय.

वाचा :

वाचा :

दलित अत्याचाराच्या घटनांत नक्कीच वाढ झालीय पण ती केवळ भाजपशासित राज्यांत नाही तर काँग्रेसचं सरकार असलेल्या राजस्थानात आणि शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार असलेल्या महाराष्ट्रातही या घटना वाढल्यात. कायदे आणि सुव्यवस्था हा राज्य सरकारांचा विषय आहे.. सोबतच समाजालाही बदलावं लागेल. त्यामुळे भाजपमुळे हे होतंय असं म्हणणं चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

आरक्षणाच्या मुद्यावर…

‘आरक्षणात ‘ या मुद्यावर बोलताना त्यांनी याला आपला आक्षेप नसल्याचं म्हटलंय. परंतु, ही गोष्ट बोलायला सोपी आहे परंतु, ती लागू करणं तितकंच कठीण आहे, असंही त्यांनी म्हटलंय. कोणत्याही आरक्षित वर्गात येणाऱ्या जातीतील लोकसंख्या आणि त्यांचा साक्षरता दर वेगवेगळा आहे. माझ्या मतानुसार, कोणत्याही आरक्षित वर्गातील ज्या जाती शिक्षणात मागे असतील त्यांच्या शिक्षणावर जोर द्या, नोकरीत ते स्वत:च बरोबरी करतील, असंही आठवले यांनी म्हटलंय.

जेव्हापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे तेव्हापर्यंत देशात आरक्षण व्यवस्था कुणीही नष्ट करू शकत नाही. आम्हाला आरक्षण नको, पण यासाठी पहिल्यांदा देशातून जातिवाद संपायला हवा… जेव्हापर्यंत देशात जातिवाद आहे तेव्हापर्यंत आरक्षण हीच आमची ताकद आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here