मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी भेट देऊन तेथील गणरायाचे सहकुटुंब दर्शन घेतले. पवारांच्या कन्या खासदार या देखील त्यांच्यासोबत होत्या. सुप्रिया यांनी या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोवरून नेटिझन्सनी त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला आहे.

वाचा:

ठाकरे व पवार कुटुंब एकत्र आल्याचे फोटो सुप्रिया यांनी त्या दिवशी शेअर केले होते. त्यात एक फोटो शरद पवार हे सपत्नीक गणरायाचे दर्शन घेत असतानाचा होता. दुसरा, दोन्ही कुटुंबाचा एकत्रित फोटो होता. तिसरा फोटो त्यांनी स्वतंत्रपणे ट्वीट केला होता. या फोटोला त्यांनी – Patankar, Sardesai, Thackeray – Sule अशी कॅप्शन दिली होती. त्यावरूनच नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केलं आहे. त्यांच्या ट्वीटवर तब्बल २०४ प्रतिक्रिया आल्या आहेत.

यातील काही प्रतिक्रिया संयत आहेत तर काहींनी सुप्रिया सुळेंवर खरपूस टीका केली आहे. एक तरुण नेतृत्व म्हणून आपल्याकडून यापेक्षा चांगल्या अपेक्षा आहेत. आपण अमानवी जातीव्यवस्थेविरोधात लढा देण्यासाठी काम करण्याची गरज आहे. तिचं उदात्तीकरण करण्यासाठी नाही, असं एकानं म्हटलं आहे. दुसऱ्या एकाने सुप्रियांना शरद पवारांचा आदर्श घेण्याचा सल्ला दिला आहे. ‘अतिशय टाकाऊ ट्विट. आपल्या जातीचा उल्लेख अभिमानाने करणे लोकप्रतिनिधींना शोभत नाही. जातीअंत काय फक्त सभेत भाषणं देण्यापुरता बोलायचा का? आपल्या वडिलांनी ‘मी मराठा आहे’ असा उल्लेख कधी केला नाही. निदान त्यांचा तरी आदर्श घ्यावा असे वाटते. चूक लक्षात येईल ही अपेक्षा,’ असं त्यानं म्हटलं आहे. काहींनी सुप्रिया सुळेंची कॅप्शन चुकल्याचा दावा केला आहे. तर, काही लोकांनी हा ‘सीकेपी’ काय प्रकार आहे, असाही प्रश्न केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here