पाटणा: ज्या मुलीच्या अंत्यविधी तयारी सुरू केली, त्याच मुलीचा आला आणि तिनं आपण जिवंत असल्याचं वडिलांना सांगितलं. त्यामुळे शोककळा पसरलेल्या घरातील वातावरण अचानक बदललं. दु:खाची जागा आनंदानं घेतली. पप्पा, मी जिवंत आहे. मेले नाहीए, हे शब्द लेकीनं उच्चारताच वडिलांसह कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला. घटना बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील अकबरपूरमधील आहे.अकबरपूरमध्ये वास्तव्यास असणारी अंशू कुमारी महिन्याभरापूर्वी घरातून रहस्यमयरित्या गायब झाली. कुटुंबियांनी तिचा खूप शोध घेतला. मात्र तिचा ठावठिकाणा सापडला नाही. गेल्या आठवड्यात पोलिसांना त्याच परिसरात असलेल्या कालव्यात एका मुलीचा मृतदेह सापडला. मृतदेह बराच वेळ पाण्यात राहिल्यानं तो फुगला होत्या. त्यामुळे चेहरा ओळखू .येत नव्हता. अंशूच्या कुटुंबियांनी कपड्यांच्या आधारे मृतदेह ओळखला. वडिलांना लेकीच्या मृत्यूनं मोठा धक्का बसला. ते अंत्यविधी करण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे अंशूच्या आजोबांनी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचं ठरवलं.अंशूच्या निधनाची आणि अंत्यविधीची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर अंशूनं वडील विनोद मंडल यांना मोबाईलवर व्हिडीओ कॉल केला. पप्पा, मी जिवंत आहे, असं अंशू म्हणाली. त्यामुळे अंत्यविधीची तयारी करणाऱ्या कुटुंबियांना आनंद झाला. दु:खाची जागा आनंदानं घेतली. यानंतर अंशूनं धीर एकवटून वडिलांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ‘प्रियकरासोबत लग्न करायचं असल्यानं मी पळून गेले होते. सध्या मी पूर्णयामधल्याच बनमनखी ब्लॉकमधील जानकीनगरमध्ये सासरी राहतेय,’ असं अंशू वडिलांना म्हणाली.घटनेची माहिती मिळताच सत्यता जाणून घेण्यासाठी अकबरपूरचे एसएचओ सूरज प्रसाद यांनी अंशूच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल केला. मी पूर्णपणे सुखरुप असून सासरी राहत असल्याचं अंशूनं पोलिसांना सांगितलं. त्यामुळे कालव्यात सापडलेला मृतदेह कोणाचा होता, असा प्रश्न निर्माण झाला. ‘कालव्यात सापडलेल्या मुलीची ओळख पटली आहे. ती घटनादेखील प्रेमसंबंधांतून घडली. प्रकरण ऑनर किलिंगचं आहे. मुलीच्या घरावर छापा टाकण्यात आला. पण तिचं कुटुंब फरार आहे. त्यांचा शोध सुरू आहे,’ अशी माहिती एसएचओंनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here