लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. साधूच्या वेशात आलेल्या एका व्यक्तीनं घराबाहेर खेळत असलेल्या मुलाला आपटून मारलं. निष्पाप मुलाच्या मृत्यूनंतर लोकांनी आरोपीला पकडलं आणि त्याची धुलाई केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. त्यांनी मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोवर्धन परिसरातील राधा कुंड परिसरात ही घटना घडली. साधू वेशात आलेल्या एका व्यक्तीनं घराबाहेर खेळत असलेल्या मुलाचे पाय पकडून त्याला जमिनीवर आपटलं. मुलाचा हृदयद्रावक शेवट झाला. घटना सीसीटीव्हीत कैद झाली. लोकांनी आरोपीला पकडलं आणि त्याला चोप दिला. यामध्ये आरोपी जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे पोहोचले. त्यांनी घटनेचा आढावा घेतला.मथुरेच्या गोवर्धन परिसरात राधाकुंड सार्वजनिक केंद्राजवळ पाच वर्षांचा मुलगा खेळत होता. त्यावेळी साधू वेशातला एक जण तिथे पोहोचला. त्यानं मुलाला उचललं आणि जमिनीवर जोरात आपटलं. त्यामुळे झाला. घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली. संतप्त स्थानिकांनी मुलाचा मृतदेह घेऊन आंदोलन केलं. आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी मुलाच्या कुटुंबियांसह स्थानिकांनी केली.राधाकुंडमध्ये ५ वर्षांच्या मुलाची हत्या झाल्याचं पोलीस अधीक्षक त्रिगुण विशन यांनी सांगितलं. आरोपीला अटक करण्यात आली असून मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असं त्रिगुण म्हणाले. आरोपी बाहेरुन आला होता. त्यानं मुलाला जमिनीवर आपटलं. त्यामुळे निष्पाप मुलाचा जीव गेला. आरोपीविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी स्थानिकांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here