सीतापूर: उत्तर प्रदेशातील सीतापूर घडलेल्या डबल मर्डर केसने सर्वत्र खळबळ माजली आहे. जिल्ह्यात टोळक्याने लोखंडी रॉडने मारहाण करून मुस्लिम दाम्पत्याचा खून केला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. अब्बास आणि कमरुल निशा अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. ही घटना सीतापूरच्या राजेपूर गावातील आहे.

आरोपींनी हल्ला केल्यानंतर घटनास्थळीच या दाम्पत्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पसार झाले. या दाम्पत्याच्या मुलाचे दुसऱ्या जातीच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यातून आरोपींनी दाम्पत्याचा खून केल्याचं समोर आलं आहे.

नवऱ्याने वडापाव आणला, सर्वांना खायला दिला, घास घेणार तेवढ्यात बायकोला संशय अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याचा मुलगा दुसऱ्या जातीच्या मुलीसोबत पळून गेला होता. पीडित दाम्पत्याचा मुलगा आणि आरोपीची मुलगी यांच्यातील प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या हल्ल्यात अब्बास आणि त्यांची पत्नी कमरूल निशा या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपींनी दोघींचीही काठ्यांनी आणि रॉडने मारहाण करून हत्या केली.

ज्याला दगड समजलं तो तर खजिना निघाला, एका रात्रीत शेतकऱ्याचं नशीब पालटलं
पोलिस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांनी सांगितले की, अब्बासचा मुलगा शौकत काही वर्षांपूर्वी शेजारच्या मुलीसोबत पळून गेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अब्बास यांच्या मुलाची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी शौकत तुरुंगातून सुटला तेव्हा कुटुंबातील काही सदस्यांनी या दाम्पत्यावर हल्ला करण्याचा कट रचला.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शौकतचे शेजारच्या रामपालच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. २०२० मध्ये मुलगी अल्पवयीन असताना शौकत तिला पळवून घेऊन गेला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शौकतची कारागृहात रवानगी केली होती. या वर्षी जूनमध्ये शौकतने पुन्हा मुलीसोबत पळून जाऊन लग्न केले.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

पोलिसांनी सांगितले की, घटनेनंतर संबंधित कलमांतर्गत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेंद्र जैस्वाल, पल्लू आणि अमरनाथ यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पहिल्यांदा जेव्हा शौकतने मुलीचे अपहरण केले तेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तर मुलीनेही शौकतच्या बाजूने आपला जबाब नोंदवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here