पुणे:वडगांव शेरी भागातील गणेश नगर परिसरात बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरातील गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आख्खं घर उद्ध्वस्त झालं आहे. या महाभयंकर स्फोटात दहा जण जखमी झाले आहेत. स्थानिकांनी जखमी रहिवाशांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेलं.

वडगाव शेरीमधील गणेश नगरात आज सकाळी सात वाजता ही घटना घडली. घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यात घराची मोठी पडझड झाली. तर घरातील दहा जण जखमी झाले आहेत. त्यात दोन पुरुष, ४ महिला आणि चार मुलींचा समावेश आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळी जवान पोहोचण्याआधीच स्थानिकांनी पुढाकार घेऊन मदत आणि बचावकार्य सुरू केले होते. अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. २ अग्निशमन बंब आणि १ रेस्क्यू व्हॅन सोबत होते. कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावून इतर तीन जणांना रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे. पोलिसांनीही घटनास्थळाची पाहणी केली. संशयास्पद वाटल्यानं त्यांनी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण केलं आहे.

आणखी बातम्या वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here