अमेरिकेतील युएस न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुप्तचर संस्थेच्या अहवालाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, चीनकडून दगाफटका होण्याचा अंदाज भारतीय जवानांना होता. चीनच्या आगळकीविरोधात जवानही सज्ज होते. त्यासाठी गस्तही वाढवण्यात आली. पॅन्गाँगमधील संघर्षात नेमकी सुरुवात कोणी केली याबाबत स्पष्टता नाही. मात्र, चीनने याआधी केलेल्या आगळकीच्या आधारे अमेरिकेने भारताची बाजू घेतली आहे. भारतासोबतचा तणाव निवळण्यासाठी प्रयत्न सुरू असताना चीनने अचानक आक्रमक पाऊल का उचलले याबाबत अमेरिकेचे गुप्तचर अधिकारी कोड्यात पडले आहे.
वाचा:
अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, चीन वादग्रस्त भागात कॅम्प बनवत होता. त्यावेळी भारतीय सैन्य त्या ठिकाणी आले व वाद झाला. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये तणाव वाढण्याआधी दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेतली. बीजिंगमधील वरिष्ठ लष्करी कमांडच्या मताच्या विरुद्ध निर्णय घेत कमांडरने मागे हटण्याचा निर्णय घेतला. कमांडरने घेतलेल्या निर्णयाचा चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.
वाचा:
तर, दुसऱ्या बाजूला भारताच्या आक्रमकतेनंतर चीनची नाचक्की झाली आहे. त्यानंतर आता चीनकडून आपली बाजू सावरण्यासाठी ‘मिशन डॅमेज कंट्रोल’ सुरू करण्यात आले आहे. मागील २४ तासांमध्ये चीनकडून पाच वक्तव्ये जारी करण्यात आली आहेत. यामध्ये दोन वक्तव्ये चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून, एक वक्तव्य चिनी लष्कराकडून, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक आणि भारतातील चिनी दूतावासाकडून एक वक्तव्य जारी करण्यात आले आहे.
वाचा:
दरम्यान, भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या महिन्यात Quad बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. या दरम्यान, गुप्त माहितीच्या आदान-प्रदानाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. त्याशिवाय अमेरिकेसोबतचे संबंध आणखी दृढ होणार आहे. चीनने मागील १० वर्षात सैन्यावरील खर्चांत प्राधान्य दिले आहे. त्याशिवाय वादग्रस्त सीमा भागात, दक्षिण चीन समुद्रात आपली सैन्य क्षमतेत वाढ केली असल्याचे म्हटले जाते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times