मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे रानावनातच रमताना दिसतात. तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने पश्चिम घाटातील निसर्गात वास्तव्य करणाऱ्या सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

तेजस उद्धव ठाकरे आणि हर्षिल पटेल यांच्या नेतृत्वातील चमूने पश्चिम घाटात सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. सह्याद्रीओफिस उत्तराघाटी (sahyadriophis uttaraghari gen. et. sp. nov.) असे नाव या नव्या प्रजातीला देण्यात आले आहे. तेजस ठाकरे आणि हर्षिल पटेल यांच्यासह कॅम्पबेल, झीशान मिर्झा यांचाही टीममध्ये समावेश होता.

आधी भारत-चीन सीमेवर ८० किलोची तोफ दरीत जाता-जाता सावरली, आता नाशिकच्या जवानाने मायलेकींचे प्राण वाचवले

नावामागील कारण काय?

नव्याने ओळखल्या गेलेल्या या वंशाला ‘सह्याद्रीओफिस’ असे नाव देण्यात आले आहे. पश्चिम घाटासाठी वापरला जाणारा ‘सह्याद्री’ हा संस्कृत शब्द आणि ‘ओफिस’ म्हणजे सापासाठी वापरला जाणारा ग्रीक शब्द विलीन करून हे नाव देण्यात आले आहे. या प्रजातीला ‘उत्तराघाटी’ असे नाव देण्यात आले आहे. ज्यात ‘उत्तरा’ म्हणजे ‘उत्तर दिशा दर्शविणारी’ आणि ‘घाटी’ हा पर्वत/घाटातील रहिवास अशा संदर्भातून आलेला शब्द आहे. हे नामकरण प्रजातींचे घाटातील उत्तरेकडे असलेला निवास दर्शवते.

तुकाराम मुंढेंविरोधातील तक्रारींची दखल का घेतली नाही, माहिती आयुक्तांचा सवाल, तात्काळ कारवाईचे आदेश
विशेष म्हणजे, बेडडोमचा कीलबॅक देखील नव्याने प्रस्तावित वंशांमध्ये हस्तांतरित करण्यात आला आहे. आता तो मध्य आणि दक्षिण पश्चिम घाटापर्यंत मर्यादित आहे, असं तेजस ठाकरे यांनी सांगितलं. हा अभ्यास आपल्याला घाटांच्या जैवविविधतेबद्दल समजून घेण्यास हातभार लावतो. हे क्षेत्र मानवजातीसाठी अद्याप रहस्यमय असल्याचं ठाकरे वाईल्डलाईफ फाऊण्डेशनने म्हटलं आहे.


याआधीही तेजस ठाकरे यांनी खेकडे, मासे, पाली अशा विविध ११ हून अधिक दुर्मिळ वन्य प्रजातींचा शोध लावून त्यांना नवी ओळख मिळवून दिली आहे.

उद्धव ठाकरेंचा चिमुकली सोबत संवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here