मुंबई: कार्डिअॅक अँब्युलन्सच्या अभावी पुण्यात पत्रकाराच्या झालेल्या मृत्यूनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर अक्षरश: टीकेची झोड उठवली आहे. मनसेनं थेट मुख्यमंत्री यांनाच लक्ष्य केलं आहे. ‘राज्य सरकारनं गेले सहा महिने कोविडच्या नावावर नुसते पैसे ओरपण्याचं काम केलं आहे,’ अशी घणाघाती टीका मनसेचे नेते यांनी केली आहे.

पुण्यातील टीव्ही पत्रकार पांडुरंग रायकर यांचा आज करोनामुळे मृत्यू झाला. ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यानं त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी कार्डिअॅक अँब्युलन्सची गरज होती. मात्र, ती वेळेवर न मिळाल्यानं त्यांना प्राण गमवावे लागले. आरोग्य सुविधांच्या या अवस्थेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवरच तोफ डागली आहे. ‘पुण्यात अलीकडेच जम्बो कोविड सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. तिथं पांडुरंग रायकर यांना का हलवलं नाही? तिथं सुविधा नव्हती का? केवळ नावाला तंबू उभारले आहेत का,’ असे प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केले.

वाचा:

‘करोनाचं ठीक आहे. पण आज लोकांना नोकऱ्या नाहीत. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कसं जगायचं हा प्रश्न लोकांना पडला आहे. हे सगळं होत असताना मुख्यमंत्री कुठे आहेत? ते कधी बाहेर पडणार आहेत? कधी लोकांना दिलासा देणार आहेत?,’ अशी सरबत्तीच त्यांनी केली. ‘सरकारनं केवळ पैसे ओरपण्याचं काम केलं आहे हे मी जबाबदारीनं सांगतो. प्रत्यक्षात रुग्णांना कुठल्याही सुविधा मिळालेल्या नाहीत,’ असा आरोपही त्यांनी केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here