वाचा:
आपल्या ६८ व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्रिपद गेल्यापासूनच खडसेंच्या मनात पक्षातून डावललं गेल्याची भावना आहे. ती नाराजी ते सातत्यानं बोलून दाखवत असतात. यावेळी मात्र त्यांनी फडणवीसांच्या एका घोषणेचाही उल्लेख केला.
वाचा:
‘प्रतिकूल परिस्थिती असतानाही एकेकाळी गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, गडकरी, गिरीश बापट, मुनगंटीवार आणि माझ्यासारख्या काही नेत्यांनी कष्टानं पक्ष उभारला होता. मागच्या वेळेस युती नसतानाही एकहाती सत्ता राज्यात मिळाली होती. आता केंद्रात सरकार असताना, अनुकूल परिस्थिती असताना सत्ता का गेली,’ असा प्रश्न त्यांनी केला. ‘मी येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का? की वेगळं काही कारण होतं? याचा शोध मी घेतोय,’ असा टोला खडसेंनी फडणवीसांना लगावला.
‘ज्या कष्टानं आम्ही ह्या महाराष्ट्रात एकट्याच्या बळावर भाजपचं सरकार आणलं, त्या कालखंडात आताचे अनेक लोक नव्हते सुद्धा. मागच्या १०-१२ वर्षात हे जन्माला आले. राजकारणात चमकायला लागले आणि आमच्यासारख्याला अक्कल शिकवायला लागले. या सगळ्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. त्या संतापाचं एकत्रिकरण कधी होईल आणि त्याचा स्फोट कधी होईल हे सांगता येणार नाही,’ असा संतापही खडसे यांनी व्यक्त केला. ‘करोनाचं (Corona) संकट दूर झाल्यानंतर मी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. यासाठी नेहमीप्रमाणे राज्यभर दौरा करणार आहे. मला अनेक पक्षांकडून ऑफर होती. पण ज्या पक्षात ४० वर्षे निष्ठेनं काढली, तो सोडून जावं असं कधी वाटलं नाही,’ असंही ते म्हणाले.
भाजपला सत्तेत यायचं असेल तर…
‘राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आणखी एक-दीड वर्षे काही उलथापालथ होईल असं वाटत नाही. या आघाडीकडे आवश्यक ते संख्याबळ आहे. भाजपला सत्तेत यायचं असेल तर केवळ काही आमदार फोडून चालणार नाही, एखादा पक्षच सोबत घ्यावा लागेल. सध्याच्या परिस्थिती ती भाबडी आशा आहे,’ असं सांगून, सध्यातरी राज्यात भाजपला संधी नाही, असं अप्रत्यक्षपणे खडसेंनी सांगून टाकलं.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
A big thank you for your article.
I really like and appreciate your blog post.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.