युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्सचे प्रवासी विमान बुधवारी तेहरानजवळच कोसळून १७६ जणांचा मृत्यू झाला होता. उड्डाणानंतर इंजिनात बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात येत होते. बोइंग ७३७ या विमानानं (पीएस ७५२) तेहरान विमानतळावरून सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी युक्रेनमार्गे कॅनडाकडे जाण्यासाठी उड्डाण भरले होते. मात्र, दोन मिनिटांतच त्याचा रडारशी संपर्क तुटला आणि विमानतळापासून ४५ किलोमीटर वायव्येला शहरयार प्रांतातील खलज अबाद येथे ते कोसळले होते. मृतांमध्ये ८२ इराणी आणि ६३ कॅनेडीयन नागरिकांचा समावेश होता. १५ बालकांचाही यात मृत्यू झाला. इराणमधील शरीफ विद्यापीठातील १३ विद्यार्थीही या विमानात होते. दरम्यान, युक्रेनचं प्रवासी विमान क्षेपणास्त्र हल्ल्यात चुकून पाडलं गेलं अशी कबुली इराणने दिली आहे. इराणच्या लष्कराने ही मानवी चूक असल्याचं म्हटलंय. ‘युक्रेनच्या विमानाचा तेहरानजवळील अपघात क्षेपणास्त्राच्या माऱ्यामुळे झाला नव्हता, याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे,’ असा दावा इराणचे नागरी हवाई उड्डाणप्रमुख अली आबेदजाहेद यांनी केला होता.
विमान लष्करी हद्दीच्या जवळून जात होता. मात्र, विमानाच्या मार्गात असं काहीही नव्हतं असं वृ्त्त आहे. सॅटेलाइट छायाचित्रांमध्ये विमानाच्या मार्गात किंवा जवळपास लष्करी तळ दिसून आलेला नाही. ज्या ठिकाणी विमानाचा संपर्क तुटला, तेथे एक उर्जानिर्मिती केंद्र आणि इंडस्ट्रीयल पार्क आहे. हे सोडलं तर परिसरात काहीच नाही, असं ब्लूमबर्गनं गुगलच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. तर विमान आपल्या निश्चित मार्गावरून जात होता, असं फ्लाइट ट्रॅकिंग सर्व्हिस फाइटरायडर २४नं म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times