म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: गुजरातच्या सुरत येथील एका शाळेपासून सुरू असलेले वाद, हेवेदावे थेट सातासमुद्रापार पोहोचले आहेत. दोन मित्रांमध्ये वर्गात पहिले येण्यापासून इतरही अनेक वाद होते. त्याचाच राग मनात धरून अमेरिकेत स्थायिक झालेल्या एकाने दुसऱ्याला त्रास देण्यासाठी पोलिसांच्या नजरेत त्याला चक्क दहशतवादी ठरवले. पोलिसांच्या चौकशीत दुसराही लंडनमध्ये नोकरी करीत असल्याची माहिती समोर आली. त्याच्याकडून शाळेपासूनच्या वादातून त्रास देण्यासाठी हे कृत्य केल्याचे समजल्यानंतर पोलिस आता अमेरिकेतील तरुणाविरुद्ध खोटी माहिती दिल्याप्रकरणी कारवाईच्या तयारीत आहेत.

थेरगाव क्विननंतर हडपसरच्या बादशाहचा पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम, रिल्समधून आव्हान देणं भोवलं, अशी अद्दल की…

अमेरिकेहून सोमवारी पुणे पोलिसांना एक फोन आला. त्याने वरळीतील एका कंपनीत उपाध्यक्षपदावर कार्यरत असलेला योगेश पटेल (नाव बदललेले आहे) हा दहशतवादी असल्याची माहिती दिली. थेट परदेशातून दहशतवाद्याबाबत माहिती मिळाल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. क्षणाचाही विलंब न करता पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांना याबाबत कळविले. मुंबई पोलिसांनीही गंभीर दखल घेत सीआययूच्या पथकाने वरळी येथील कंपनीचे कार्यालय शोधून काढले. योगेशबाबत माहिती मिळवत असताना त्याने वर्षभरापूर्वी नोकरी सोडल्याचे कळले. तो लंडनमध्ये नोकरी करीत असल्याची माहिती मिळाली.

पोलीस पत्नीला ड्युटीवरुन आणलं, मोठ्या मुलीला शाळेत सोडलं; जिथे ‘हृदय’, तिथेच नवऱ्याने दोघींना संपवलं

पोलिसांनी कंपनीतून त्याच्या कुटुंबीयांबाबत अधिक माहिती मिळवत त्याचा मोबाइल क्रमांक मिळवला. त्याच्याशी संपर्क साधून अमेरिकेतून आलेल्या फोनबाबत त्याला सांगण्यात आले. अमेरिकेतून फोन आल्याचे समजल्यावर योगेशच्या डोळ्यासमोर यश पाटील (नाव बदलेले आहे) या त्याच्या शाळेतील मुलाचा चेहरा समोर आला. मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांना त्याने यशबाबत सविस्तर कहाणी सांगितली. ‘सुरतच्या एका शाळेत आम्ही दोघे शिकत होतो. अभ्यासात प्रथम येण्यापासून इतर अनेक बाबींमध्ये आमच्या दोघांमध्ये हेवेदावे असत. तेव्हापासून यश मला त्रास देण्यासाठी असे काही ना काही करतो,’ असे म्हणणे योगेशने मांडले. यावरून पोलिसांनी अमेरिकेहून फोन करणाऱ्याची माहिती काढली असता त्याचे नाव यश पाटीलच असल्याचे स्पष्ट झाले. योगेशला विनाकारण त्रास देण्यासाठी यशने त्याच्याबाबत खोटी माहिती दिली. विनाकारण यंत्रणेला कामाला लावल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here