रायपूर: पाच वर्षांपू्र्वी बेपत्ता झालेल्या न्यूज एँकरच्या मृतदेहाचे अवशेष रस्त्याच्या खाली सापडली आहेत. सलमाच्या हत्येनंतर आरोपींनी तिचा मृतदेह जमिनीत पुरला होता. त्यानंतर याच ठिकाणी चौपदरी मार्ग तयार झाला. सलमाच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी हा मार्ग खणण्यात आला. पोलिसांकडून शोध मोहीम राबवली जात असताना, रस्ता खणण्याचं काम सुरू असताना या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.कोरबाच्या खासगी न्यूज चॅनेलची अंकर असलेली २०१८ मध्ये बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी कुसमुंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. अखेर पाच वर्षांनी पोलिसांच्या हाती सलमाच्या मृतदेहाचे अवशेष लागले आहेत. त्यासाठी पोलिसांनी कोरबा दर्री हा चौपदरीकरण झालेला मार्ग खणला. या रस्त्याच्या बांधकामासाठी ४२ कोटी रुपयांचा खर्च आला होता. भवानी मंदिराजवळील रस्ता खणण्याचं काम पोलिसांनी नव्यानं हाती घेतलं. यानंतर दुसऱ्याच दिवशी एका गोणीत मृतदेहाचे अवशेष सापडले.दर्री सीएसपी रॉबिनन्स गुरिया आणि कुसमुंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्ण कुमार वर्मा यांच्यासोबत रायपूरचं एक पथक सलमाच्या मृतदेहाचे अवशेष शोधत होतं. अखेर त्यांना यश आलं. तत्पूर्वी चौपदरीकरण झालेल्या रस्त्या खोदण्यासाठी पोलिसांनी स्थानिक कोर्टात अर्ज केला होता. तिथून त्यांना परवानगी मिळाली. या प्रकरणात मधूर साहू आणि त्याचे साथीदारी अटकेत आहेत. सलमाचा मृतदेह या भागात पुरण्यात आल्याची कबुली त्यांनी दिली होती. त्याच माहितीच्या आधारे खोदकाम करण्यात आलं.पाच वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं?२५ वर्षांची सलमा सुल्ताना कुसमुंडातील एसईसीएल वसाहतीत राहायची. न्यूज एंकर म्हणून तिला करिअर करायचं होतं. जिम ट्रेनर असलेल्या मधूर साहूसोबत तिची जवळीक वाढली. यानंतर २०१८ मध्ये ती एकाएकी बेपत्ता झाली. तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळी अंत्यसंस्कारालादेखील सलमा नव्हती. तिची स्कूटी स्टेशनवर सापडली. मोबाईल स्विच्ड ऑफ होता.सलमाच्या कुटुंबियांनी जिम संचालक मधूर साहूवर संशय व्यक्त केला. मधूरनं पोलिसांची दिशाभूल केली. कित्येक वर्ष पोलिसांना तपास लागत नव्हता. सलमाचं नेमकं काय झालं हा प्रश्न अनुत्तरित होता. पण मधूरचा एक निकटवर्तीय फितूर झाला. मधूरशी वाद झाल्यानंतर त्यानं संपूर्ण रहस्य उलगडलं. मधूरसोबत आर्थिक व्यवहारांवरुन वाद झाल्यानंतर त्यानं सगळा घटनाक्रम पोलिसांना सांगितला. यानंतर पोलिसांनी मधूरचा शोध सुरू केला. तो फरार झाला. पण पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here