नवी दिल्ली : यश ही खडतर संघर्षांची कहाणी असते, पण काही संघर्ष इतके प्रेरणादायी असतात की त्यांच्यासमोर यशाचा रंगही फिका पडतो. मलय देबनाथची यशोगाथाही अशीच आहे. प्रतिकूल परिस्थितीशी लढा देऊन यशाची पायरी चढतात तेच लोक इतिहास रचतात. मलय देबनाथ देखील अशाच काही लोकांपैकी आहेत ज्यांनी अवघ्या १०० रुपयांपासून कोट्यवधींच्या कॅटरिंग व्यवसायापर्यंत प्रवास केला आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांसमोर एक आदर्श ठेवला.

मलय देबनाथ यांचा संघर्षमय प्रवास
१९८८ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यातील एका दुर्गम गावातून मलय देबनाथ यांनी खिशात अवघे १०० रुपये घेऊन दिल्ली गाठली. घरात आपल्या लहान भावंडं आणि नातेवाईकांना आधार देण्यासाठी त्यांना कामाची गरज होती. आपल्या मेहनतीमुळे मलयने संपूर्ण देशात करोडोंची मालमत्ता जमा केली. त्यांच्या खानपान व्यवसायाव्यतिरिक्त ते सहा ट्रेनमध्ये पेंट्रीचे कामही सांभाळतात. देबनाथ केटरर्स अँड डेकोरेटर्स असे त्यांच्या कंपनीचे नाव आहे, जी एक प्रसिद्ध केटरिंग फर्म आहे.

मुलींसाठी सायकल बनवणाऱ्या कंपनीनं कुटुंबातील महिलांचे हक्क नाकारले; मुलगी लढली अन् जिंकली
वडिलोपार्जित व्यवसाय ठप्प पडला
देबनाथचे आजोबा १९३५ मध्ये पूर्व बंगालमधून (आता बांगलादेश) पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित झाले होते. त्यांच्या कुटुंबाची समाजात खूप प्रतिष्ठा होती. कुटुंबाचा विणकामाचा व्यवसाय होता. त्यांच्या आजोबांनी गावातील वंचित मुलांसाठी शाळा बांधण्यासाठी जमीनही उपलब्ध करून दिली होती. शाळेची ही इमारत आजही उभी आहे. पण वेळेने यूटर्न घेतला आणि मलय देबनाथच्या बालपणातच कुटुंबासामोर मोठे संकट येऊन उभे राहिले. त्यानंतर राजकीय मतभेदामुळे त्यांचा व्यवसाय पेटवून देण्यात आला आणि ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. कुटुंबाने त्यांची फर्म पुन्हा सुरू केली तरीही कुटुंब त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळवू शकले नाही. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस परिस्थिती आणखीनच बिकट झाली.

मलय यांना शिक्षण सोडावे लागले
देबनाथ, त्याची मोठी बहीण आणि त्याचे दोन लहान भाऊ शाळेत शिकत होते. कुटुंबावर गरिबी ओढावली. वडील काम शोधात असताना देबनाथ गावात कुटुंबाचा छोटाशा चहाच्या व्यवसायात हातभार लावू लागले. शाळेत जाण्यापूर्वी आणि तिथून घरी आल्यानंतर ते आपला संपूर्ण वेळ व्यवसायात लक्ष द्यायचे. बारावी उत्तीर्ण होईपर्यंत तीन वर्षे चालू राहिले. यानंतर त्यांनी आपले शिक्षण सोडले. आईकडून १०० रुपये घेऊन मलयने दिल्ली गाठली.

एकेकाळी ऑफिस बॉय म्हणून केली नोकरी, बीडचे दादासाहेब आज आहेत दोन कंपन्यांचे मालक
कठोर परिश्रमाने स्वतःचे नशीब लिहिले
मलय देबनाथचा खरा प्रवास दिल्लीत आल्यानंतर सुरू झाला, जिथे त्यांनी केटररचे काम सुरू केले. कामाच्या वेळेनंतरही त्यांना काम करावे लागत होते. ते धुणी भांडी करण्यासोबत टेबल साफही करायचे. चांगली गोष्ट म्हणजे मलयने असे काम करण्यापासून कधीच संकोच केला नाही आणि सतत मेहनत घेतली. त्यांच्या बहुतेक सहकाऱ्यांनीही अडचणीमुळे नोकरी सोडली पण मलय सतत मेहनत करत राहिले, त्यामुळे त्यांना मालकाचा स्नेह आणि आदर मिळाला. एका वर्षानंतर त्यांचा पगार ५०० रुपयांवरून तीन हजार रुपये करण्यात आला. देबनाथने घरी पैसे पाठवण्यासाठी १९ तासांच्या शिफ्टमध्ये काम केले. ओव्हरटाईममधून मिळालेले पैसे स्वतःचे जेवण आणि राहण्यासाठी वापरायचे.

१२०० रुपये पहिले वेतन, आज ११५०० कोटींचे मालक; १५० वर्ष जुन्या वडिलोपार्जित व्यवसायाने नशीब बदलले
…मग असं बदललं आयुष्य
कालांतराने मलयनेही वेगळी वाट निवडली. ते दिल्लीतील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत सुपरवायझर म्हणून रूजू झाले. याशिवाय त्यांनी ITDC (इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या इव्हेंट कंपनीत काम करताना देबनाथला खूप एक्स्पोजर मिळाले. ही कंपनी मोठ्या पार्ट्यांचे आयोजन करायची. या कार्यक्रमांमध्ये त्याने अनेक नवीन मित्रही बनवले. नव्या लोकांच्या संपर्काने मलय देबनाथने खानपान कंपनी सुरू केली.

आज मलयला दिल्ली, पुणे, जयपूर, अजमेर आणि ग्वाल्हेरसह ३५ हून अधिक आर्मी मेस सुविधांवर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आले असून त्यांनी उत्तर बंगालमधील चहाच्या बागांसह सुमारे २०० कोटी रुपयांची मालमत्ता जमवली असताना त्यांच्या दोन मुली पुणे आणि ऑस्ट्रेलियात शिकत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here