लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या महापौर सुषमा खर्कवाल बिजनोरमधील एका रुग्णालयात रुग्णाला पाहण्यासाठी गेल्या होत्या. रुग्ण आयसीयूमध्ये होता. खर्कवाल त्याला भेटण्यासाठी जात असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यानं त्यांना चप्पल बाहेर काढून ठेवण्यास सांगितलं. त्यामुळे महापौर संतापल्या. यानंतर रुग्णालयाबाहेर पोहोचला. यानंतर रुग्णालयाबाहेरील पोस्टर पाडले जाऊ लागले. प्रकरण तापू लागताच पोलीस पोहोचले. त्यांनी प्रकरण शांत केलं.लखनऊमधील विनायक मेडिकेअर या खासगी रुग्णालयात सुरेंद्र कुमार यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरेंद्र कुमार नगरपालिकेत कार्यरत आहेत. कुमार सध्या आयसीयूमध्ये आहेत. सोमवारी संध्याकाळी महापौर सुषमा खर्कवार त्यांना भेटायला पोहोचल्या. महापौरांसोबत त्यांचे कार्यकर्तेदेखील आयसीयूमध्ये शिरु लागले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेरच रोखलं. त्यामुळे महापौर नाराज झाल्या.पुढच्या काही तासांत नगरपालिकेचा बुलडोझर रुग्णालयाबाहेर पोहोचला. त्यानं बॅनर, पोस्टर पाडण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून रुग्णालयातील कर्मचारी बाहेर आले. रुग्णालय प्रशासन आणि पालिका कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयाबाहेर पोहोचले. त्यांनी महत्प्रयासानं प्रकरण शांत केलं. नगर पालिका आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांवर आरोप केले.रुग्णालयाच्या संचालिका मुद्राका सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी महापौर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आयसीयूमध्ये जाण्यापासून रोखलं. त्यांच्या पायात चपला होत्या. चपला न काढताच ते आयसीयूमध्ये जात होते. पण महापौर नाराज झाल्या आणि त्यानंतर संध्याकाळीच रुग्णालयाबाहेर बुलडोझर पोहोचला. या प्रकरणावर भाष्य करण्यास महापौरांनी नकार दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here