पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोचा पुढचा प्लॅन सांगितला
नरेंद्र मोदी यांनी आपण आपल्या डोळ्यांनी इतिहास घडताना पाहिला आहे, असं म्हटलं आहे. हा क्षण अविस्मरणीय आहे. ही घटना विकसित भारताच्या शंखनादाचा आहे. आज आपण अवकाशात नव्या भारताच्या नव्या यशाचे साक्षीदार बनले आहोत. मी सध्या आफ्रिकेत असून नवा इतिहास घडताच भारतात जल्लोष होत आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी परिश्रमानं यश मिळवलं आहे. भारत जिथं पोहोचला तिथं जगातील कुठलाही देश पोहोचला नाही, असं नरेंद्र मोदी म्हणाले. भारताचं यश फक्त भारताचं नाही तर हे संपूर्ण जगाचं आहे. इस्त्रोनं सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य एल १ मिशन लाँच करणार आहे. त्यानंतर शुक्र ग्रह देखील इस्त्रोच्या आगामी काळात असेल. गगनयान याद्वारे पहिल्या मानवसहीत अंतरळान पाठवणार आहे. भारताचा आधार विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. आजचा दिवस देश लक्षात ठेवेल. आजचा दिवस आपल्याला पराभवातून धडा घेऊन यश कसं मिळवलं जातं याची साक्ष देणारा आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. भारताच्या जनतेला पुढील काळातील यशासाठी शुभेच्छा देतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.