सोलापूर:राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदेनी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना वक्तव्य केले की,भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आगामी लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून दोन लाख मतांनी निवडून येतील.राष्ट्रवादीच्या एका आमदाराने भाजप खासदार निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.राष्ट्रवादीचे अजित पवार हे महायुतीत दाखल झाल्यानंतर सोलापूर राष्ट्रवादी मधील तिन्ही आमदार अजित पवार यांच्या सोबत गेले आहेत.माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना, राष्ट्रवादीच्या आमदार बबनदादा शिंदे यांनी भाजप खासदारांचे कौतुक केले आहे.माढा येथील शिंदे गटाचे शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी हे वक्तव्य ऐकून तिखट प्रतिक्रिया देत बेगानी की शादी मे अब्दुला दिवाना असे संबोधले आहे.राष्ट्रवादीचे आमदार असताना,शरद पवार यांचे नाव न घेता,भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा नाव घेत ,बबनदादा शिंदेनी राजकीय दिशा स्पष्ट केली आहे.

Chandrayaan 3 च्या यशानंतर मुंबई इंडियन्सचे भन्नाट ट्विट, रोहितचा फोटो पोस्ट करत म्हणाले…

माढा मतदारसंघात राष्ट्रवादीने किंमत मोजली

माढा मतदार संघातून विजयसिंह मोहिते पाटील यांनी २०१४ साली खासदारकीची निवडणूक जिंकली होती. २०१९ साली मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता.२०१९ साली रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मोदी लाटेत खासदार म्हणून निवडून आले होते. याच माढा मतदार संघातून राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदे हे २०१९ साली आमदार झाले. २००९ ते २०१४ पर्यंत माढाचे खासदार शरद पवार होते.विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्या नंतर राष्ट्रवादीच्या हातून हा लोकसभा मतदारसंघ निसटला.२०१९ मध्ये भाजपचे रणजितसिंह निंबाळकर हे निवडून आले होते. राष्ट्रवादीतून भाजप मध्ये गेलेले विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांची काही दिवसांपूर्वी भेट झाल्याने पुन्हा एकदा राजकिय गणिते बदलणार की काय असे चित्र निर्माण झाले आहे.
Chandrayaan-3 : चांद्रयान ३ ची मोहीम फत्ते, भारतानं इतिहास रचला, इस्त्रोचं स्वप्न पूर्ण, चंद्रावर पहिलं पाऊल

बबनदादा शिंदेच्या वक्तव्यावर शिंदे गटाच्या नेत्याचं उत्तर

राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदेंनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना असे सांगितले,गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खासदारकीच्या निवडणुकीत एक लाख मतांची लीड मिळाली होती.आगामी लोकसभा निवडणुकीत दोन लाख मतांची लीड मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.माढा मतदारसंघातील शिंदे गटाचे संजय कोकाटे यांनी याला प्रत्युत्तर देत ,बबनदादा शिंदेंना बेगानी शादी मे अब्दुला दिवाना असे संबोधले आहे.स्वतःच्या मुलाला विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे आहे म्हणून ही तयारी सुरू आहे त्यामुळं शिंदे राजकीय वक्तव्य करत आहेत, असा आरोप कोकाटेंनी केला.

Chandrayaan 3 : सॉफ्ट लँडिंगनंतर विक्रम लँडरकडून पहिला फोटो अन् मेसेज, चंद्राचा दक्षिण ध्रुव कसा दिसतो पाहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here