नागपूर: बिलाचे पैसे मागितल्याने काँग्रेस नेत्याच्या तोतया स्वीय सहायकाने हॉटेल अंबिकाच्या संचालकावर चाकूने हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून ललित रामसंजीवन अग्निहोत्री (३३, रा. रामनगर, वर्धा) याला अटक केली आहे. दुर्गाप्रसाद रामनरेश पांडे (४५, रा. गणेशपेठ कॉलनी), असे जखमी संचालकाचे नाव आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
बीड हादरलं! पतीच्या डोक्यात शिरले संशयाचे भूत; घेतला टोकाचा निर्णय, अन् घडलं धक्कादायक कृत्य
पांडे कुटुंबीयांचे बसस्थानकासमोर हॉटेल अंबिका आणि जाधव चौकात हॉटेल ब्रिज इन आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगून ललित हा गेल्या दोन वर्षांपासून हॉटेलमध्ये जेवण करायचा. कधीकधी तो मित्रांनाही हॉटेलमध्ये जेवायला आणायचा. बिलाचे पैसे द्यायचा नाही. दोन वर्षांत त्याने ५० हजार रुपयांची उधारी केली. काही दिवसांपूर्वी दुर्गाप्रसाद पांडे यांना याबाबत कळाले. मंगळवारी दुपारी ललित हा हॉटेल ब्रिज इनमध्ये जेवायला गेला. जेवण केले. पैसे न देताच तो परत गेला.

२०२४ नंतर ताकद वाढेल, आम्ही उठल्यास सरकार जाईल, बच्चु कडूंचा किंगमेकर होण्याचा दावा

त्यानंतर पुन्हा रात्री ११.३० वाजताच्या सुमारास तो हॉटेलमध्ये आला. जेवण केले. दुर्गाप्रसाद यांनी त्याला दोन वर्षांतील जेवणाचे ५० हजार रुपये मागितले. त्यावर दुपारीच अंबिका हॉटेलमध्ये ५० हजार रुपये जमा केल्याचे त्याने दुर्गाप्रसाद यांना सांगितले. दुर्गाप्रसाद यांनी शाहनिशा केली असता ललितने पैसे जमा न केल्याचे समोर आले. यावरून दुर्गाप्रसाद यांनी त्याला हटकले असता ललितने त्यांच्यासोबत वाद घालून चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. कर्मचाऱ्यांनी धाव घेत ललितला पकडले. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी त्याला अटक केली. दुर्गाप्रसाद यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here