साताराः जावळीतील मार्ली घाट या ठिकाणी काही दिवसांपूर्वी आढळलेल्या मृतदेहांनी जिल्हात खळबळ माजली होती. एकाच कुटुंबातील व्यक्तींची हत्या करण्यात आली असल्याचं प्रकरण ताजं असतानाच सातारा जिल्ह्यातील शिवराज पेट्रोल परिसरातातील डोंगराळ भागात आणखी एक मृतदेह सापडल्यानं जिल्हा हादरला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील शिवराज पेट्रोल परिसरातील डोंगराळ भागात एका पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ वर्ष. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाची कसून तपासणी करत असून मृत व्यक्तीची ओखळ पटविण्याचा प्रयत्न करत आहेत. संशयास्पद परिस्थितीतमध्ये मृतदेह आढळल्यानं याबाबत घातपात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, नेमका मृत्यू कशामुळं झाला याचे कारण शवविच्छेदनानंतरच समजू शकणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच साताऱ्यातील मार्ली घाटात चार मृतदेह आढळले होते. या प्रकरणी एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आलं असून हे खून पैशांच्या अमिषातून करण्यात आल्याच समोर आलं होतं. मार्ली घाटाप्रमाणेच इथंही असाच प्रकार झाला नसेल. असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here