अहमदनगर: महाराष्ट्रातील महत्वाच्या अनेक ठिकाणी ज्या शिल्पकाराचे शिल्प पहायला मिळतात. ते सुप्रसिद्ध शिल्पकार यांच्यामुळे नगरच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला जाणार कारण देशाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या श्री राम मंदिर , याच मंदिरात प्रदक्षिणा मार्गावर शिल्पकार प्रमोद कांबळे यांचे हातचे 3D शिल्प लावले जाणार आहेत. यासाठी माती शिल्प तयार करण्यासाठी देशभरातील जवळपास एक हजार कलाकारांकडून नमुने मागवण्यात आले होते. त्यानंतर प्रमोद कांबळे यांनी बनवलेल्या मॉडेलची निवड करण्यात आली.
या मातीच्या शिल्पाप्रमाणेच हुबेहूब दगडांची शिल्प बनवण्यात येणार आहेत. रामायणातील तब्बल शंभर प्रसंग या शिल्पाच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहेत. प्रभू श्रीराम यांच्या जन्माच्या प्रसंगापासून ते वनवास आणि प्रभू श्रीराम यांचा वनवास संपवून परतल्याच्या प्रसंगापर्यंत अनेक प्रसंग यात साकारण्यात आले आहेत.

“हे काम करण्याची मला संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो, माझ्यावर असलेली जी जबाबदारी फार मोठी असून ती नीटपणे पार पाडणे हे महत्त्वाचे आहे,” अशी भावना शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी व्यक्त केली.
हे शिल्प बनवताना ते सात्त्विक भावनेतून बनवावे यासाठी शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी अनेक पथ्य देखील पाळली. सुरुवातीला हे शिल्प वेगवेगळ्या कलाकारांकडून बनवून घेतली जाणार होती मात्र त्या प्रसंगातील प्रत्येक शिल्पात एकसारखेपणा असावा म्हणून एकाच कलाकाराकडून हे काम करण्याचे ठरले. त्यानुसार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओत या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी २१,२२ आणि २३ जानेवारी या तीन तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.