या चारही धरणांत २८.९७ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात पाऊस ओसरल्याने पानशेत धरणातून खडकवासला धरणात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे. वरसगाव धरणातून खडकवासला धरणात ८८८ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. दिवसभर १७१२ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.
पिंपरी चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरातही पावसाने विश्रांती घेतली. हे धरण सुमारे ९८ टक्के भरले आहे. या धरणातून २१६० क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
जिल्ह्यातील अन्य धरणांपैकी डिंभे, घोड, कळमोडी, चासकमान, आंद्रा, कासारसाई, मुळशी, गुंजवणी, निरा देवघर, भाटघर, वीर, नाझरे ही धरणे भरली आहेत. उजनी धरणही शंभर टक्के भरले असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times