जळगाव: जिल्ह्यातील करोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरूच आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल १३४२ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर १८ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता वाढून २८ हजार ९३३ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या दोन दिवसात जिल्ह्यातील १ हजार ९४ रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील करोना संसर्गाचा वेग काही केल्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात दोन दिवसात तब्बल १३४२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. त्यात मंगळवारी ५४१ तर बुधवारी ८०१ रुग्णांचा समावेश आहे. या दोन दिवसात एकूण १८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या वाढून आता ८३१ वर पोहचली आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाला मंगळवारी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये एकूण ५४१ रुग्ण समोर आले होते. त्यात जळगाव शहर ११७, जळगाव ग्रामीण २९, भुसावळ ३५, अमळनेर ९०, चोपडा ५७, पाचोरा ८, भडगाव ११, धरणगाव ३३, यावल १०, एरंडोल ३१, जामनेर ५७, रावेर ५, पारोळा २४, चाळीसगाव ६, मुक्ताईनगर १२, बोदवड ११ तसेच इतर जिल्ह्यातील ५ रुग्णांचा समावेश होता. तर बुधवारी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये जळगाव शहर १९३, जळगाव ग्रामीण ३८, भुसावळ ६९, अमळनेर ५१, चोपडा ८२, पाचोरा ८, भडगाव ६, धरणगाव २१, यावल २०, एरंडोल १२८, जामनेर ६२, रावेर २०, पारोळा १७, चाळीसगाव ५४, मुक्ताईनगर २, बोदवड २२ तसेच इतर जिल्ह्यातील ८ रुग्णांचा समावेश होता.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार ८३० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७२७२ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात ११५६ रुग्ण हे लक्षणे असलेले तर ६११६ रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. १६५ रुग्णांवर आयसीयूत उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे, ५४७ रुग्णांना ऑक्सिजन लावलेले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here