वाचा:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब व अल्पवयीन मुलगा वर्गमित्र असून, आफताब हा दहावी उत्तीर्ण तर अल्पवयीन मुलगा अनुत्तीर्ण झाला. मंगळवारी आफताब व मुलामध्ये वाद झाला. आफताब याने त्याला शिवीगाळ केली. दोघांनाही एकमेकांवर दगडफेक केली. यात आफताब जखमी झाला. हल्ला करणारा मुलगा त्याला घेऊन जवळीच दुकानात गेला. आफताबच्या डोक्याला झालेल्या जखमेवर त्याने चहापूड लावली. त्यानंतर पुन्हा दोघांमध्ये वाद झाला.
वाचा:
आफताबने त्याला शिवीगाळ केली. त्यातूनच संतप्त होऊन मुलाने आफताबचा कटरने गळा चिरला. गंभीर जखमी होऊन आफताब याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह कडे रवाना केला. खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. आफताबचे वडील रफीक खान रिक्षाचालक आहेत. आफताबला दोन बहिणी आहेत. मारेकरी मुलाचे वडील गाइड असून, त्याच्या आईचे निधन झाले आहे. तो आजी आणि वडिलांसोबत राहातो.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times