सार्वजनिक क्षेत्राव्यतिरिक्त खासगी आणि सहकारी बँकांनाही रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्या लागू होतात. आरबीआयनुसार सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, परदेशी बँका आणि सहकारी बँका स्थानिक सणांनुसार राष्ट्रीय सुट्ट्या आणि प्रादेशिक सुट्ट्यांवर बंद राहतील. प्रादेशिक सुट्ट्या संबंधित राज्य सरकारे ठरवतात. ६ आणि ७ सप्टेंबर रोजी कृष्ण जन्माष्टमी आणि २८ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादनिमित्त देशभरातील बँका बंद राहतील.
सप्टेंबर महिन्यात भरमसाठ सुट्ट्या
भारतात काही दिवसात सणासुदीचा काळ सुरू होणार आहे, त्यामुळे सप्टेंबर महिन्यात बँकांना भरपूर सुट्ट्या आहेत. आगामी महिन्यात कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलाद यामुळे अनेक दिवस बँका बंद राहतील. अशा स्थितीत या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असल्यास सुट्ट्यांची यादी पाहूनच नियोजन करण्याचा सल्ला दिला जाते, अन्यथा तुम्हाला नंतर खूप त्रास सहन करावा लागू शकतो. सप्टेंबर महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी पाहा.
३ सप्टेंबर: रविवार
६ सप्टेंबर: श्री कृष्ण जन्माष्टमी
७ सप्टेंबर: जन्माष्टमी/दहीहंडी (महाराष्ट्र)
९ सप्टेंबर: दुसरा शनिवार
१० सप्टेंबर: दुसरा रविवार
१७ सप्टेंबर: रविवार
१८ सप्टेंबर: वर्षसिद्धी विनायक व्रत आणि विनायक चतुर्थी
१९ सप्टेंबर: गणेश चतुर्थी (महाराष्ट्र)
२० सप्टेंबर: गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) आणि नुआखाई (ओडिशा)
२२ सप्टेंबर: श्री नारायण गुरु समाधी दिन
२३ सप्टेंबर: चौथा शनिवार आणि महाराजा हरिसिंह यांचा वाढदिवस
२४ सप्टेंबर: रविवार
२५ सप्टेंबर: श्रीमंत शंकरदेवांची जयंती
२७ सप्टेंबर: मिलाद-ए-शरीफ (प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिवस)
२८ सप्टेंबर: ईद-ए-मिलाद (महाराष्ट्र)
२९ सप्टेंबर: ईद-ए-मिलाद-उल-नबी (जम्मू आणि श्रीनगर) नंतर इंद्रजात्रा आणि शुक्रवार
बँक ग्राहकांसाठी ऑनलाईन बँकिंगची सुविधा
सप्टेंबरमध्ये सणासुदीमुळे बँकांचे कामकाज बंद राहील. अशा परिस्थितीत जर तुम्हाला या दरम्यान रोख रक्कम हवी असेल तर तुम्ही ATM मधून आगाऊ (ॲडव्हान्स) पैसे काढू शकता. याशिवाय तुम्ही नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा UPI द्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता.