नवी दिल्ली : असं म्हणतात की नशिबात जे लिहिलं आहे तसेच नेहमी घडतं, मग तुम्ही कितीही प्रयत्न करा. हरियाणा येथे स्थित चक्रधर गाडे यांच्या कुटुंबीयांनी कदाचितच विचार केला असेल की त्यांनी ज्या मुलाला शिकवले, ज्याने स्वतः IIM ची पदवी घेतली, तो लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून दूध विक्री सुरू करेल. सुरुवातीला चक्रधर यांना घरच्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले पण त्यांचा मुलावर विश्वास होता. घरच्यांच्या याच विश्वासावर चंक्रधर जोखीम पत्करत राहिले आणि आज स्थिती अशी आहे की ते पाच हजार कोटींच्या कंपनीचे मालक आहेत.

देशातील अनेक राज्य आणि शहरांमध्ये दूध पुरवणारा लोकप्रिय ब्रँड, कंट्री डिलाइटचे चक्रधर गाडे मालक आहेत. तुम्ही देखील ॲपद्वारे दूध किंवा इतर पदार्थ मागले असतील, पण या उत्पादनामागे जी व्यक्ती आहे तिच्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

वडील वॉचमन, डोंबिवलीत बालपण; बारावी नापास, कॉलेज अर्ध्यावर सोडलं; आता तीन कंपन्यांचे मालक
कंट्री डिलाइटची सुरूवात कशी झाली
२००४ मध्ये अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यावर गाडे देशातील प्रसिद्ध आयटी कंपनी, इन्फोसिसमध्ये रूजू झाले. सुमारे एक वर्ष आयटी कंपनीत काम केल्यानंतर गाडे यांनी नोकरी सोडली आणि IIM इंदूरमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना Indxx कॅपिटल मॅनेजमेंटकडून नोकरीची ऑफर मिळाली. कंपनीच्या उपाध्यक्ष पदासह (व्हाइस-प्रेसिडेंट) लाखोंमध्ये त्यांना पगार होता.

६ वर्ष काम केल्यावर त्यांना वाटले की आपण नोकरीसाठी नाही. त्यांना काम करायचे होते पण कसे आणि कुठे? असा प्रश्न त्यांच्या मनात होता. यादरम्यान त्यांची भेट नितीन कौशल यांच्याशी झाली. दोंघांची चांगली मैत्री झाली आणि दोंघांनी मिळून व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले.

परदेशात बर्गरच्या दुकानात राबताना देसी चव आठवली; MBA पदवीधराकडून दुकान सुरू, कोटींचा बिझनेस
भेसळयुक्त दुधाने त्रस्त
चक्रधर स्वतः दिल्ली-एनसीआरमध्ये भेसळयुक्त दुधाच्या समस्येशी झगडत होते. इथूनच त्यांना व्यवसायाची कल्पना सुचली. नितीनसोबत त्यांनी पहिली दोन वर्षे ताजे दूध लोकांच्या घरी पोहोचवण्याचे काम केले आणि २०१३ मध्ये कंट्री डिलाइट सुरू केले. लोकांचा अभिप्राय, त्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी ते स्वतः अनेक वेळा लोकांच्या घरी दूध पोहोचवायचे. भेसळयुक्त दुधामुळे लोक चिंतेत असल्याचे त्यांनी समजले. अशा स्थितीत त्यांनी शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत दूध पोहोचवण्याच्या सिद्धांतावर काम सुरू केले.

अडचणीनंतर यशाला गवसणी
सुरूवातीला दोघांनी पार्ट-टाइम दुधाची विक्री सुरू केली, पण २०१५ त्यांनी नोकरी सोडली आणि आपले पूर्ण लक्ष व्यवसायावर केंद्रित केले. बाजार समजून घेत ग्राहकांच्या गरजा समजून घेतल्या, प्लॅनिंग आणि नियोजन करण्यास सुरूवात केली. कंट्री डिलाईटच्या माध्यमातून ते लोकांना नैसर्गिक, ताजे आणि भेसळविरहित दूध देण्याच्या कामात सहभागी झाले. शेतकऱ्यांकडून थेट दूध खरेदी करत पुढील २४ ते ४८ तासांत ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे. सहा वर्षे त्यांनी त्यांची कंपनी बूटस्ट्रॅपवर ठेवली आणि २०१७ मध्ये त्यांना पहिला निधी मिळाला.

घर सोडलं, एकेकाळी हॉटेलमध्ये धुतली भांडी, मग सुरू केला रेस्टॉरंट व्यवसाय; आज ३०० कोटींचे मालक
ॲपद्वारे थेट ग्राहकांशी कनेक्ट झाले
लोकांना कंट्री डिलाइट दूध आवडू लागले. हळूहळू त्यांनी भाजीपाला-फळ, पनीर, दही, हळद स्नॅक्स, बेकरी उत्पादने आपल्या ब्रँडमध्ये जोडली. आज त्यांचा व्यवसाय ॲपद्वारे सबस्क्रिप्शन मॉडेलवर चालत असून त्यांची कंपनी दुधासह दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू ग्राहकांच्या दारात पोहोचवण्याचे काम करते. एका महिन्यात पाच कोटी ऑर्डर दिल्लीवर करतात तर त्यांचे सहा हजाराहून अधिक वितरण भागीदार आहेत.

कंट्री डिलाइट देशभरातील १५ शहरांमध्ये कार्यरत आहे ज्यात दिल्ली-NCR, मुंबई, नोएडा, गुरुग्राम, हैदराबाद, चेन्नई यासारख्या मोठ्या शहरांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये त्यांनी ६०० कोटी रुपयांचा ऑपरेशन महसूल मिळवला. आज कंट्री डिलाइटचे बाजार मूल्य $६१५ दशलक्ष पर्यंत पोहोचले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here