रत्नागिरी: भारताची मान अख्ख्या जगात उंचावणारं इस्रोचं चांद्रयान-३ हे बुधवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी चंद्रावर यशस्वीरित्या उतरलं. चंद्राच्या दक्षिण धृवावार चांद्रयान-३ ने यशस्वी लँडिंग केलं. आजवर कुठलाही देश चंद्राच्या या भागात पोहोचू शकलेला नव्हता. जगाला जे जमलं नाही ते भारतानं करुन दाखवलं. इस्रोच्या या मोहिमेत महाराष्ट्रातीलही अनेक जण सहभागी होते. त्यापैकीच एक म्हणजे रत्नागिरी येथील अश्विनी विलास जांभळीकर.

रत्नागिरी शहरातील फाटक प्रशालेची माजी विद्यार्थिनी अश्विनी विलास जांभळीकर ही विद्यार्थ्यांनी इस्त्रोमध्ये काम करीत आहे. भारताने चांद्रयान-३ मोहीम यशस्वी केली. फाटक हायस्कूलची ही विद्यार्थिनी आणि ती इस्रोमध्ये काम करते हे वाचून अभिमान वाटावा असंच आहे. अश्विनी मुळातच हुशार होती. रत्नागिरीतून फाटक हाय स्कूलमध्ये असताना मार्च ९१९१ साली झालेल्या एसएससी परीक्षेत बोर्डाच्या गुणवत्ता यादीत नववी आली होती.

भारत चंद्रावर, पण रुग्णवाहिका गावात पोहोचेना, प्रसुतीवेदनांसह गर्भवतीचा ४ किमी झोळीतून प्रवास
चांद्रयान-३ मोहिमेसंबंधात तिचाही सहभागाबद्दल आणि यानाच्या यशस्वी लँडिंग बाबत सर्वच ISRO टीमचं अभिनंदन करण्यात येत आहे. संस्थेला ही बाब अभिमानास्पद आहे. देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरही अभिमानास्पद ठरलेल्या या चांद्रयान मोहिमेच्या टीममध्ये या कोकण कन्येचा सहभाग होता. ही मोठी आणि अभिमानास्पद असलेली माहिती रत्नागिरी येथील ज्येष्ठ वकील बाबा परुळेकर यांनी दिले आहे.

असा सुरू झालेला चांद्रयान – ३ चा प्रवास

६ जुलै २०२३ : ‘चांद्रयान ३’चे १४ जुलै रोजी प्रक्षेपण करण्याची ‘इस्रो’कडून घोषणा

११ जुलै : ‘चांद्रयान ३’च्या प्रक्षेपणाची रंगीत तालीम

१४ जुलै : श्रीहरिकोटा येथून दुपारी २.३५ वाजता ‘चांद्रयान ३’चं प्रक्षेपण

१५ जुलै : यानावरील थ्रस्टर्स प्रज्ज्वलित करण्यात आले. त्यामुळे यान पृथ्वीभोवती ४१,७६२ बाय १७३ किलोमीटरच्या कक्षेत

१७ जुलै : यानाची कक्षा बदलून ४१,६०३ बाय २२६ किलोमीटर

२२ जुलै : यानाची कक्षा वाढवून ७१,३५१ बाय २३३ किलोमीटर

२५ जुलै : यानाची कक्षा आणखी एकदा बदलण्यात आली.

१ ऑगस्ट : यान २८८ बाय ३,६९,३२८ किलोमीटरच्या कक्षेत नेण्यात आलं.

चांद्रयान-३ मोहिमेत बोर्डीतील शास्त्रज्ञाचा सहभाग, ऐतिहासिक क्षणानंतर शिक्षकांशी साधला संवाद
५ ऑगस्ट : यान चंद्राच्या कक्षेत पोहोचलं. १६४ बाय १८,०७४ किलोमीटर या कक्षेत यान चंद्राभोवती परिभ्रमण

६ ऑगस्ट : यानाची कक्षा आणखी कमी करून, १७० बाय ४३१३ किलोमीटर

९ ऑगस्ट : कक्षा कमी करून १७४ बाय १४३७ किलोमीटर

१४ ऑगस्ट : यानाची कक्षा १५१ बाय १७९ किलोमीटर करण्यात आली

१६ ऑगस्ट : कक्षा पुन्हा बदलून १५३ बाय १६३ किलोमीटर

१७ ऑगस्ट : चांद्रयानाचे प्रॉपल्शन आणि लँडर मॉड्यूल विलग

१८ ऑगस्ट : लँडर मॉड्यूलची कक्षा कमी करून ११३ बाय १५७ किलोमीटर

२० ऑगस्ट : लँडरचा वेग कमी करण्यासाठी डीबूस्टिंग करण्यात आलं. त्यामुळे कक्षा २५ बाय १३४ किलोमीटर

२३ ऑगस्ट : विक्रम लँडर ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरलं

चांद्रयान-3, लँडर इमेजर कॅमेर्‍याने सेफ लँडिंगवेळी चंद्राची प्रतिमा कॅप्चर केली

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here