नवी दिल्ली: हेट स्पीच () प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात कारवाई न करण्याबाबत आरोप झालेले असताना आता भारतीय जनता पक्षाच्या (BJP) आमदाराविरोधात फेसबुकने (Facebook) कारवाई केली आहे. फेसबुकने तेलंगणमधील भाजप आमदा (T Raja Singh) यांना बॅन केले आहे. द्वेष आणि हिंसेला उत्तेजन देणाऱ्या मजकुराद्वारे फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या भाजप नेत्याला बॅन करण्यात आले आहे. फेसबुकच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. ( bans the account of leader )

द्वेष परवणे आणि हिंसेला उत्तेजन देण्याच्या विरोधातील फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आम्ही राजा सिंह यांच्यावर आमच्या प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे, असे मेलद्वारे प्रसिद्ध केलेल्या एका निवदनात फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपचे नेते, आमदार टी. राजा सिंह यांचे अकाउंट फेसबुकवरून काढून टाकण्यात आले आहे, असे प्रवक्त्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

भारत हे फेसबुकसाठी विशाल असे मार्केट आहे. भारतात फेसबुकचे ३०० मिलियनहून अधिक यूजर्स आहेत. द वॉल स्ट्रिट जर्नल या अमेरिकेतील एका दैनिकाने भारतात भारतीय जनता पक्षाच्या बाजूने काम करत असल्याचा आरोप केला होता. फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी प्रमुख अंखी दास (Ankhi Das) यांच्यासंदर्भात या दैनिकाने काही दावे केले होते.

या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी प्रमुख अंखी दास यांनी गेल्या काही वर्षांमध्ये पोस्टद्वारे सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्षाचे समर्थन केले आहे. यानंतर सर्वांचे लक्ष फेसबुककडे वळले. मात्र आपण कोणत्याही प्रकारचा पक्षपात करत नसल्याचे फेसबुकने स्पष्ट केले होते.

क्लिक करा आणि वाचा-

दरम्यान काल बुधवारी फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन आयटी व्यवहार विषयक संसदीय समितीसमोर हजर झाले. कॉंग्रेस नेते शशी थरूर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या संसदीय समितीने फेसबुकच्या प्रतिनिधींना सुनावणीसाठी बोलवले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर रोखण्यासाठी ही सुनावणी घेण्यात आली होती.

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here