नवी मुंबई: सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी या खाडीवर तिसरा उड्डाणपूल उभारला जात आहे. या तिसऱ्या खाडी पुलाची पहिली मार्गिका मे २०२४ मध्ये वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे. त्यानंतर दुसरी मार्गिका सप्टेंबर २०२४ मध्ये खुली होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी वाशी येथे व्यक्त केला.
समाजासाठी काही वेगळं करण्याची उमेद; त्या दृष्टीने निवडला मार्ग, अन् तरुणानं थेट…
सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी वाशी येथील तिसऱ्या खाडी पुलाच्या कामाची पाहणी केली. तसेच कामाचा आढावा घेतला. कामे वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी एमएसआरडीएचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, डी. एम. मोरे, नितीन बोराळे, उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील यांच्यासह पुलाचे काम करणाऱ्या एल अँड टी कंपनीचे अधिकारी आणि एमएसआरडीसीचे अधिकारी उपस्थित होते.

ऐ बारिश थम थम के आना, पवार स्टेजवर आले की पाऊस येतोच ; श्रीनिवास पाटलांची फटकेबाजी

मुंबई-पुणे महामार्गावरील खाडीवरील जुना पूल हा सन १९७१ मध्ये बांधण्यात आला होता. त्यानंतर दुसरा पूल सन १९९५ मध्ये बांधण्यात आला. आता दोन मार्गिकांच्या तिसऱ्या खाडीपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यातील एक मार्गिका मे २०२४ मध्ये तर, दुसरी मार्गिका सप्टेंबर २०२४ मध्ये वाहतुकीसाठी सज्ज होईल. सध्या दोन ठाणे खाडीपुलांवर सहा मार्गिका आहेत. तिसऱ्या खाडीपुलाचे काम पूर्ण झाल्यास हा संपूर्ण रस्ता १२ पदरी होणार आहे. या माध्यमातून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे, असे भुसे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितले. ठाण्यातील साकेत पुलावरील नादुरुस्ती संदर्भात संबंधित विभागाला कळविण्यात आले असून कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here