सुशांतसिंह प्रकरणात कंगना राणावत ही सुरुवातीपासून वेगवेगळी वक्तव्य करत आहे. सर्वात आधी कंगनानं सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाही व कंपूशाहीला जबाबदार धरलं होतं. कालांतरानं ती राजकीय नेते व मुंबई पोलिसांवर टीका करू लागली. सुशांत प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर कंगनानं बॉलिवूड व ड्रग माफियांमधील संबंधांची माहिती देण्याची तयारी दर्शवली होती. तिला मुंबई पोलिसांनी संरक्षण द्यावं, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली होती.
वाचा:
राम कदम यांच्या त्या संदर्भातील ट्वीटला प्रतिसाद देताना कंगनानं मुंबई पोलिसांवर कडवट टीका केली होती. ‘गुंड आणि मुव्ही माफियांपेक्षा मला आता मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकारची किंवा थेट केंद्राची सुरक्षा हवी आहे. मुंबई पोलिसांची नको, प्लीज,’ असं तिनं म्हटलं होतं. त्यावरून संजय राऊत यांनी तिला चंबूगबाळं आवरून निघून जा, असं सुनावलं होतं. तर, कंगनाला राम कदम यांचीच भीती वाटली पाहिजे, अशी खोचक टीका केली होती. त्यानंतर आता माजी खासदार यांनी कंगनानं मुंबई पोलिसांवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे.
वाचा:
‘काही अधिकारी दबाला बळी पडले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी ठरत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्याइतकी कंगना राणावत कोण लागून गेली? सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडले जावेत असं आमचंही मत आहे. त्यासाठीच्या मागणीला आमचा पाठिंबाच आहे, पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही,’ असा इशारा नीलेश राणेंनी कंगनाला दिला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times