गाझियाबादमधील शास्त्री नगरमध्ये हा तरुण राहतो. या तरुणाकडे बीटेकची पदवी आहे. तो गुरुग्राम येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत (Multinational Company) काम करतो. या इंजिनीयर मुलाच्या वतीने त्याचे वकील मनोज कुमार यांनी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. या इंजिनीयर तरुणाचे मामा मेरठ येथे राहतात. या मामाने आपल्या भाच्याच्या आई आणि वडिलांवर दबाव टाकून जून २०१९ मध्ये आपल्या मेव्हण्याच्या मुलीचे त्याच्याशी लग्न लावून दिले होते.
मुली पाहिल्याबरोबर या तरुणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. त्यानंतर कुटुंबातील लोकांनी त्याच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. या दबावापुढे झुकत त्या तरुणाने शेवटी त्या मुलीसोबत लग्न केले. माझ्या व्यक्तीमत्वाशी ही मुलगी जराही जुळत नसल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे. याचे कारण म्हणजे ही मुलगी खूपच ठेंगणी आहे. तसेच ती रंगाने सावळी आहे. तिला आपल्या मित्रांकडे घेऊन गेल्यांतर माझे मित्र चेष्टा मस्करी करतात, असे या तरुणाचे म्हणणे आहे.
क्लिक करा आणि वाचा-
आपल्याला कोणतीही शिक्षा दिली तरी देखील आपण ती भोगण्यास तयार आहोत, मात्र आपण एकजात या मुलीसोबत राहणार नाही, असा पणच या तरुणाने केला आहे. कोर्टाने या तरुणाचा अर्ज स्वीकारला आहे. या प्रकरण सामंजस्यासाठी मध्यस्ती केंद्रात वर्ग करण्यात आले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
क्लिक करा आणि वाचा-
(मटा ऑनलाइन एखाद्या व्यक्तीचा रंग आणि उंचीवरून त्या व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यक्तिमत्वाचे मूल्यमापन करत नाही . व्यक्तीचा रंग आणि उंचीवरून व्यक्तीचे मूल्यमापन करणे गैर असल्याचेच मटा ऑनलाइन मानतो.)
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times