मुंबई : देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमच्या शेअर होल्डर्ससाठी आनंदाची बातमी आहे. शुक्रवारच्या व्यवहार सत्रात कंपनीचे शेअर्स चार टक्के उसळी घेत १८ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. ब्लॉक डीलद्वारे कंपनीचे सुमारे २.३ कोटी किंवा ३.६% इक्विटी शेअर्सची अदलाबदल करण्यात आली, ज्यामुळे कंपनीचा स्टोक ९३९ रुपयांवर पोहोचला, जो १८ महिन्यांतील उच्चांक आहे.

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी दुपारी १२ वाजता पेटीएमचा शेअर १.११% वाढीसह ९१४.२० रुपयांवर व्यवहार करत होता. पेटीएमच्या शेअरने नोव्हेंबर २०२२ मध्ये नीचांकी पातळी गाठली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रवर्तक अँटफिनने ब्लॉक डीलद्वारे आपला ३.६% हिस्सा विकला आहे.

अंबानी है तो मुमकिन है! JFSL शेअर्समध्ये उसळी, अप्पर सर्किटला धडक, गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज
पेटीएम शेअर्स इश्यू किंमतीपासून आपटले
पेटीएमची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशन २०२१ मध्ये आयपीओ घेऊन आली होती. IPO किंमत रु. २१५० निश्चित करण्यात आली होती, मात्र, बाजारात लिस्ट झाल्यापासून कंपनीचे शेअर आत्तापर्यंत या किमतीच्या जवळपासही पोहोचू शकलेले नाहीत. म्हणजेच पेटीएम शेअर सध्या IPO किंमतीपासून सुमारे ५७ टक्क्यांनी आपटला आहे.

दुसरीकडे, पेटीएम शेअर्समध्ये या वर्षी ७०% पेक्षा जास्त तेजीने व्यवहार झाला असून अलिकडच्या काळात कंपनीच्या महसुलात सातत्याने वाढ होताना तोटा कमी झाला आहे. स्टॉकने नोव्हेंबर २०२२ च्या नीचांकावरून १००% पेक्षा जास्त उडी घेतली असताना कंपनी आर्थिक वर्ष २०२५ च्या मध्यात ऑपरेटिंग ब्रेकइव्हन साध्य करू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

8 रुपयांचा शेअर 800 पार; गुंतवणूकदारांचे खिसे भरणारा शेअर स्वस्तात उपलब्ध, खरेदी करावा का?
पेटीएम शेअरची किंमत आणखी किती वाढणार?
ग्लोबल रिसर्च आणि ब्रोकिंग फर्म बर्नस्टीनने पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडचे कव्हरेज सुरू करत आउटपरफॉर्म रेटिंग असलेल्या कंपनीच्या स्टॉकवर त्यांनी १,१०० रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली. तर ब्लूमबर्गच्या अहवालानुसार १२ ब्रोकरेजने पेटीएम स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला असताना दोन होल्ड करण्याचा आणि कुणीही ‘सेल’चा सल्ला दिलेला नाही.

‘Chandrayaan-3’च्या यशाचा बाजारात जल्लोष; या कंपन्यांची रॉकेट भरारी, गुंतवणूकदार मालामाल
(नोट : येथे फक्त स्टॉकच्या कामगिरीबद्दल माहिती दिली असून तो गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणे जोखमीच्या अधीन आहे आणि गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here