यंदाच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार होणार असल्यामुळे अमेरिकेतील प्रत्येक समाजघटकाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेत अमेरिकन-हिंदू मतदारांची संख्या निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे ट्रम्प आणि बायडन यांनी हिंदू मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी विविध मार्ग अवलंबले आहेत. अमेरिकेत जवळपास २० लाख हिंदू मतदार आहेत. बायडन यांनी ‘हिंदू अमेरिकन्स फॉर बायडन’ अशी मोहीम सुरू केली आहे. बायडन यांनी हिंदू समुदायावर होणारे अन्याय आणि भेदभावाच्या समस्या सोडवणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
वाचा:
वाचा:
‘हिंदू अमेरिकन्स फॉर बायडन’ या मोहिमेच्या आयोजकांनी सांगितले की, अमेरिकन-भारतीय खासदार राजा कृष्णमुर्ती ‘हिंदू अमेरिकन्स फॉर बायडन’ च्या पहिल्या बैठकीला संबोधित करणार आहेत. बायडन यांनी हा निर्णय ट्रम्प यांच्या अशाप्रकारच्या मोहिमेच्या घोषणेनंतर जवळपास दोन आठवड्यांनी घेतला आहे. ट्रम्प यांनी ‘हिंदू व्हाइज फॉर ट्रम्प’ अशी मोहीम सुरू केली आहे.
वाचा:
अमेरिकेच्या निवडणुकीत याआधीदेखील धार्मिक अल्पसंख्याक समुदायाला आपल्याकडे वळवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न करण्यात आले आहेत. विशेषत: हिंदू अमेरिकन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेत हिंदू मतदारांचा प्रभाव वाढत असल्याचे म्हटले जात आहे.
‘हिंदू अमेरिकन्स फॉर बायडन’ या अभियानाचे सहप्रमुख बालाजी मुरली यांनी सांगितले की, हिंदू अमेरिकन नागरिकांना दुर्लक्ष करता येणार नाही. हिंदू अमेरिकन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्यावर मार्ग काढण्यासाठी थेट संवाद साधणार आहोत. मोठ्या प्रमाणावर हिंदू अमेरिकन नागरिका डेमोक्रेटिक पक्षाला मतदान करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ‘इंडियन व्हॉइसेस फॉर ट्रम्प’, ‘हिंदू व्हॉइसेस फॉर ट्रम्प’, ‘सिख्स फॉर ट्रम्प’ आणि ‘मुस्लिम व्हॉइसेस फॉर ट्रम्प’ या संघटना सुरू करण्यात आल्या आहेत. या संघटनांच्यावतीने देशभरातील समुदायांना ट्रम्प यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. डेमोक्रेटीक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी भारतीय-आफ्रिकन वंशाच्या कमला हॅरीस यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्याशिवाय कृष्णवर्णीयांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळेही ट्रम्प यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निवडणुकीत महत्त्वाची असणाऱ्या आशियाई, आफ्रिकन मतांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी ट्रम्प आणि बायडन यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times