सांगली : जिल्ह्यातील कवठेमहांकाळ बस स्थानकातच महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाद होऊन धारदार शस्त्राने भोसकून एका तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धुळा कोंडीबा कोळेकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. भरदिवसा अतिशय वर्दळीच्या ठिकाणी खून झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. या खुनाच्या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने तपासाची चक्रे फिरवून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कवठेमहांकाळ येथील बस स्थानकावर शनिवारी दुपारच्या सुमारास नेहमीप्रमाणे शालेय विद्यार्थी व प्रवासी यांची गर्दी होती. यावेळी एस. टी. स्टॅन्डवरील कॅन्टीनच्या जवळील फलाटावर धुळा कोळेकर हा थांबला होता. यावेळी अज्ञात तरुण त्याच्याजवळ आले आणि त्यांनी थेट धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात धुळा कोळेकर हा गंभीर जखमी झाला.

मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा मोठा निर्णय; पर्यायी मार्ग…

नातेवाईकांनी त्याला तातडीने मिरज येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दीड दोन महिन्यांपासून धूळा कोळेकर आणि काही तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला होता. एकमेकांकडे रागाने बघितले असल्याची खुन्नस होती. शनिवारी दुपारी पुन्हा त्यांच्यात वाद झाला होता. त्याचाच राग मनात धरून काही संशयित तरुणांनी कोळेकर हा बस स्थानकात थांबला असता त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, खुनाच्या घटनेचा अंगावर शहरे आणणारा थरार हा बस स्थानकात असणाऱ्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here