मुंबई: ‘पुण्यात अधिक लक्ष द्यायला हवं हे मुख्यमंत्री यांचं सुरुवातीपासूनच सांगणं होतं. तिथं घाईघाईनं लॉकडाऊन उठवण्यात आलं, त्यासही मुख्यमंत्र्यांचा विरोध होता,’ असा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार यांनी आज केला.

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. पुण्यातील टीव्ही पत्रकार यांचं काल वेळेवर कार्डिअॅक अँब्युलन्स न मिळाल्यानं निधन झालं. त्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. कोविडच्या संदर्भातील अन्य मुद्द्यांवरूनही सरकारवर टीका केली जात आहे. त्याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी आपली भूमिका मांडली. ‘महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली इथे उभारण्यात आलेली कोविड सेंटर व्यवस्थित सुरू आहेत. काही त्रुटी असू शकतात. पुण्यातील कोविड सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध होण्याआधीच ते सुरू करण्यात आलं होतं, असं आता समोर आलंय. मात्र, प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला दोष देण्याची पद्धत चुकीची आहे. पांडुरंग रायकर यांना मी व्यक्तिश: ओळखत होतो. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली गेली अशी माझी माहिती आहे. दुर्दैवानं त्यांना अँब्युलन्स मिळायला उशीर झाला. पुण्यासारख्या शहरात हे होणं बरोबर नाही. सरकारनं यापुढं याची काळजी घेतली पाहिजे, असं ते म्हणाले.

वाचा:

‘पुण्यात आता करोनाशी लढण्याचा मुंबई पॅटर्न राबवला जातोय. काही अडचणी असतील तर त्या दूर करून जनतेला उत्तम सुविधा मिळतील याची काळजी घेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. केवळ राज्य सरकार आणि महापालिकेचीच नाही. विरोधकांचीही आहे. शेवटी जनता आणि शहर हे सर्वांचं आहे,’ असं राऊत म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here