दौंड: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात झाला आहे. यात महिला आणि लहान मुलांसह ७ ते ८ मजूर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात ट्रॅक्टरमधील मजूर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
गरोदर बहिणीला डॉक्टरकडे घेऊन जात होता; रस्त्यात रेड्याने दिली दुचाकीला धडक, अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवार दि. २७ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर घडला आहे. मजुरांना घेऊन चौफुला बाजूकडून यवत बाजूकडे जाणारा ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात महिला लहान मुलांसह इतर ७ ते ८ मजूर गंभीर स्वरूपात जखमी झाले आहे.

अजित पवारांच्या ताफ्याला बीडमध्ये महिलांनी दाखवले काळे झेंडे, मनसेच्या पदाधिकारी असल्याची माहिती

या विचित्र अपघातात ट्रॅक्टरमधील हे मजूर रस्त्यावर विचित्र अवस्थेत पडलेले होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेत रुग्णवाहिकेला प्राचारण केले. जखमी मजुरांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्यांपैकी दोन ते तीन मजूर गंभीर मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. ट्रॅक्टरमध्ये अंदाजे १५ ते १६ मजूर ट्रॅक्टरमधून प्रवास करत होते. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास ससून रुग्णालयात पाठवण्याची माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here